Video : 'उद्धवा अजब तुझे सरकार', देशद्रोही अस्लम आता देशभक्त झाले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 10:50 AM2019-12-31T10:50:51+5:302019-12-31T10:50:58+5:30

काँग्रेसचे मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार अस्लम शेख यांनी मुंबई बॉम्ब हल्ल्यातील

'Uddhav ajab tuze sarkar', the seditious Islam has now become a patriot, kirit somaiyaa critis on uddhav thackeray | Video : 'उद्धवा अजब तुझे सरकार', देशद्रोही अस्लम आता देशभक्त झाले 

Video : 'उद्धवा अजब तुझे सरकार', देशद्रोही अस्लम आता देशभक्त झाले 

Next

मुंबई - ठाकरे सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून यामध्ये काँग्रेसच्या 10 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनीही मंत्री आणि गोपनियतेची शपथ घेतली. मात्र, अस्लम शेख यांच्या शपथविधीवरुन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. भाजपा खासदार किरीट सोमैय्या यांनी ट्विटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत, उद्धवा अजब तुझे सरकार असे म्हणत टोला लगावला. 

काँग्रेसचे मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार अस्लम शेख यांनी मुंबईतील 1993 च्या बॉम्ब हल्ल्यातील आरोपी दहशतवादी याकूब मेमनला फाशी न देता माफी द्यावी, अशी मागणी विधानसभेत केली होती. यावेळी, शिवसेना आमदारांनी अस्लम शेख यांचा कडाडून विरोध केला होता. तसेच, त्यांनी देशद्रोही असेही म्हटले होते. मात्र, त्याच अस्लम शेख यांचा आता उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यावरुन भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका करत उद्धव यांना टार्गेट केलं.  

''काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षानं महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 'देशद्रोही आता देशभक्त झाले... उद्धवा, अजब तुझे सरकार' असं सोमय्यांनी म्हटलं आहे.''
उद्धवा अजब तुझे सरकार... देशद्रोही आता देशभक्त झाले आहेत. सन 2015 च्या अधिवेशनावेळी सध्याचे मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी याकूब मेमनच्या मृत्युदंडाची शिक्षा माफ करण्याची मागणी केली होती. त्यावेळी, भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांनी 6 वेळा महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन स्थगित केलं होतं, अस्लम शेखला देशद्रोही असंही म्हटलं होतं. मात्र, आता तेच अस्लम शेख उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री बनले आहेत, असे म्हणत सोमैय्या यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.
 

Web Title: 'Uddhav ajab tuze sarkar', the seditious Islam has now become a patriot, kirit somaiyaa critis on uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.