उद्धवा, अजब तुझे सरकार..! ठाण्यात महागाईवरून वणवा, शिवसेनेचा मोर्चा

By अतुल कुलकर्णी | Published: September 26, 2017 03:11 AM2017-09-26T03:11:56+5:302017-09-26T03:12:17+5:30

गीतरामायणकार ग. दि. माडगुळकर यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेले गाणे आज खरे ठरावे हा योगायोग की दैवदुर्विलास हे ज्याचे त्याने ठरवावे.

Uddhav, Ajab your government ..! Thane's inflation, Shiv Sena's front | उद्धवा, अजब तुझे सरकार..! ठाण्यात महागाईवरून वणवा, शिवसेनेचा मोर्चा

उद्धवा, अजब तुझे सरकार..! ठाण्यात महागाईवरून वणवा, शिवसेनेचा मोर्चा

Next

मुंबई : गीतरामायणकार ग. दि. माडगुळकर यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेले गाणे आज खरे ठरावे हा योगायोग की दैवदुर्विलास हे ज्याचे त्याने ठरवावे. ‘जगाच्या पाठीवर’ या सिनेमातील हे गीत एवढ्या वर्षांनी या जगाच्या रितीवर उठून दिसावे असा हा सारा काळ अचंबित करणारा आणि तेवढीच मती गुंग करणाराही... ज्यांना सत्ता दिली तेच सत्ता सोपानापासून दूर पळत आहेत आणि ज्यांना जनतेने नाकारले ते ही तुम्ही सत्ता सांभाळा आम्ही टेकू देतो म्हणतात तेव्हा तर गदिमांच्या ओळी सतत डोकी प्रहार करत राहतात.
निमित्त असेच घडले. साहित्यिकांच्या ठाण्यात महागाईवरून वणवा पेटला आणि शिवसेनेने त्यासाठी मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चाचे नेतृत्व याच भाजपा शिवसेनेच्या सरकारमधील कॅबिनेट दर्जाचे मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एवढ्यावरच हे थांबले नाही तर मंत्रिमहोदयांनी महागाई कमी करण्यासाठी या सरकारला पावले उचलावीच लागतील, असे ठणकावून सांगितले. ज्यांनी जिल्हाधिकाºयांना आदेश द्यायचे, ठणकावून कृती करायला सांगायची. तेच मोर्चा काढून जाब विचारू, अशी भाषा करु लागले.
आधी अधिकारी आमचे ऐकत नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:च म्हणायचे. त्या पुढे जाऊन या विधानाची सत्यता पटवून देण्याचे काम केले ते भाजपा सरकारमधील सोलापूरच्या पालकमंत्री विजय देशमुख यांनी. ते भाजपाचे राज्यमंत्री. त्यांच्या जिल्ह्यात तुकाराम मुंडे नावाचे जिल्हाधिकारी आले. लोकांनी त्यांच्या बदलीसाठी आंदोलन सुरू केले. तेव्हा हे कलेक्टर आपले ऐकत नाहीत, असे म्हणून पालकमंत्री देशमुख आंदोलकांच्या मंडपात जाऊन बसले. तर एकनाथ शिंदे यांनी सरकारच्याच विरोधात भव्य मोर्चा काढून निवेदन दिले. गदिमांनी लिहून ठेवले आहे.
‘उद्धवा, अजब तुझे सरकार,
लहरी राजा, प्रजा आंधळी,
अधांतरी दरबार... उद्धवा...
या अशा अजब सरकारची ही गजब कथा... मंत्री मोर्चे काढत आहेत. आंदोलनात सहभागी होत आहेत. यातून हेच दिसते की मंत्रालय आता सचिवालय बनू लागले आहे..!

सरकार अधिका-यांच्या अधीन
तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सचिवालय हे नाव बदलून आता येथे मंत्री बसतात, असे सांगत मंत्रालय नाव केले होते.हे सरकार अधिकाºयांच्या किती अधीन गेले आहे याचे महत्त्व पटवून देणारी ही घटना सोमवारी घडली.

Web Title: Uddhav, Ajab your government ..! Thane's inflation, Shiv Sena's front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.