Join us

Unlock 4: उद्धव ठाकरे लोकल, मेट्रो सुरु करण्याच्या विरोधात?; राज्यातील अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स होणार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 2:23 PM

केंद्राच्या सूचनेनंतर राज्यात ई-पास रद्द करण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई: राज्यात आज अनलॉक ४ ची नियमावली जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अनलॉक ४च्या नियमावलीमधून राज्य सरकार ई-पास रद्द करण्याच्या विचारात आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. केंद्राच्या सूचनेनंतर राज्यात ई-पास रद्द करण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्य सरकार रेस्टॉरंट टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा विचार करत आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सद्यपरिस्थितीत लोकल ट्रेन आणि मेट्रो सेवा सुरू करण्याच्या विरोधात असल्याचं बोललं जात आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागातून मुंबईत कामासाठी येणाऱ्या नोकरदारांचे प्रमाणा मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या तीनही शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव देखील जास्त आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी विचारात घेऊन राज्य सरकार लोकल सुरु करण्याबाबत सावध पवित्रा घेत असल्याचे दिसून येत आहे.

तसेच जिम, मंदिर आताच सुरु करण्याबाबत सरकारचा विचार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या कार्यालयात उपस्थिती वाढवण्याची शक्यता आहे. सध्या 15 टक्के असलेली उपस्थिती वाढवून 30 टक्क्यावर नेण्याचा विचार आहे. याबाबतही आज आदेश जारी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने अनलॉक ४ ची नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंचत कडक लॉकडाऊन सुरुच राहणार आहे. याचबरोबर येत्या 7 सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रोसेवा सुरु होणार असून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यक्ती आणि माल वाहतुकीला सूट देण्यात आली आहे. म्हणजेच देशात कुठेही मुक्त संचार  करता येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी, ई परमीट, ईपासची गरज राहणार नसल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

नववी ते बारावीचे विद्यार्थी त्यांच्या  शाळांमध्ये जाऊ शकणार आहेत. ही सूट केवळ कंटेनमेंट झोनमध्ये नसलेल्या शाळा आणि विद्यार्थ्य़ांना देण्यात आली आहे. हे विद्यार्थी केवळ शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाऊ शकणार आहेत. यासाठी त्या विद्यार्थांच्या पालकांची लेखी संमती लागणार आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक, खेळ,  करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आदी कार्यक्रमांना 100 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी 21 सप्टेंबरपासून पुढे मिळणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या- 

तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती'

गुंगीचं औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; वेश्याव्यवसायातही ढकलल्याची घटना

"सचिन सावंत तुम्ही नगरसेवक म्हणून फक्त एकदा निवडून या अन् उभं राहायचं धाडस दाखवा"

आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकारलोकलमेट्रोमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉक