उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना दोन हजारांचा दंड, आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 06:05 AM2024-08-01T06:05:06+5:302024-08-01T06:06:33+5:30

एक हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित दोन हजार रुपये दोन आठवड्यांत जमा करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले.

uddhav thackeray and sanjay raut fined 2 thousand and application for acquittal rejected | उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना दोन हजारांचा दंड, आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना दोन हजारांचा दंड, आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना  मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी एक हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित दोन हजार रुपये दोन आठवड्यांत जमा करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने बुधवारी दिले.

शिंदेसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी केलेल्या मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेला अर्ज दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला. 

या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विलंब झाल्याने दोन्ही नेत्यांनी विशेष आमदार/ खासदार न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने दोन हजार रुपये दंड ठोठावून तो दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश ठाकरे आणि राऊत यांना दिले. दोन दिवस सार्वजनिक सुट्टी होती. १८, १९ जूनला पैसे भरण्यासाठी गेले असता काउंटरवर फाईल पोहोचली होती. २२ जूनला  कारकुनाने पैसे भरण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने पैसे स्वीकारले नाहीत, असे ठाकरे यांच्या वकिलांनी न्यालयाला सांगितले.

 

Web Title: uddhav thackeray and sanjay raut fined 2 thousand and application for acquittal rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.