Join us

कसब्यात टिळकांच्या घराण्याला, तर गोव्यात पर्रिकरांच्या मुलाला भाजपानं टाकलं; उद्धव ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 2:30 PM

वापरा आणि फेका हीच भाजपाची निती राहिली आहे. कसब्यात टिळकांच्या घराण्याला आणि गोव्यात पर्रिकरांच्या मुलाला भाजपानं टाकलं

मुंबई-

वापरा आणि फेका हीच भाजपाची निती राहिली आहे. कसब्यात टिळकांच्या घराण्याला आणि गोव्यात पर्रिकरांच्या मुलाला भाजपानं टाकलं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. मविआच्या या विजयावर प्रतिक्रिया देताना लोक आता वेगळा विचार करू शकतात हे या निकालावरुन समोर आलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

"भाजपाची निती नेहमीच वापरा आणि फेका अशीच राहिली आहे हे मी कसबा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हाही म्हटलं होतं. कसब्यात टिळकांच्या घराण्याला उमेदवारी दिली नाही. भाजपानं टिळकांच्या घराण्याला टाकलं. तर गिरीश बापट यांची तब्येत ठिक नसतानाही त्यांना प्रचाराला उतरवलं. गोव्यातही मनोहर पर्रिकरांबाबत तेच केलं गेलं. पण त्यांच्या पश्चात मुलाला भाजपानं बाजूला केलं", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

भाजपा विरोधातील मतं आता एकत्र करण्याची गरजकसब्याच्या निकालानं लोक वेगळा विचार करू शकतात हे दाखवून दिलं आहे. चिंचवडमध्येही भाजपा विरोधातील मतं पाहिलं तर तिथंही आज भाजपाविरोधात निकाल लागला असता. भाजपा विरोधातील मतांना एकत्र कसं करता येईल हाच मोठा प्रश्न आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :उद्धव ठाकरे