Join us

शरद पवारांच्या राम मंदिराबाबतच्या विधानाला उद्धव ठाकरेंची बगल; थेट बोलणं टाळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 9:02 AM

अयोध्येत जे राम मंदिर उभं राहतंय, त्यापेक्षा कोरोनाची चिंता जास्त आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही, असं शरद पवार बोलले आहेत. त्यांचंही मत आपल्यासारखंच आहे की, कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर्स हवेत, असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की...

मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीबाबत भाष्य केले. मात्र यावेळी शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत केलेल्या विधानाबाबत केलेल्या विधानावर थेट भाष्य करणे उद्धव ठाकरे यांनी टाळले.

अयोध्येत जे राम मंदिर उभं राहतंय, त्यापेक्षा कोरोनाची चिंता जास्त आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही, असं शरद पवार बोलले आहेत. त्यांचंही मत आपल्यासारखंच आहे की, कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर्स हवेत, असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. डॉक्टर हवेतच. आपण ज्या सुविधा निर्माण करत आहोत, या सुविधा रुग्ण बरा करणार नाहीयेत, या सुविधांसोबत डॉक्टर्स पाहिजेत. मी आधीच जे म्हटलं होतं की  जंबो फॅसिलिटी हवी. म्हणजे आम्ही काय बेडचं दुकान नाही काढलेलं. फर्निचरचं दुकान नाही काढलंय.  प्रदर्शन नाही भरवलंय. बेडवर जेव्हा रुग्ण येईल. तेव्हा त्या रुग्णाच्या बेडच्या बाजूला डॉक्टर आणि सिस्टर पाहिजे आणि हातात औषध पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान,  कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना हे जागतिक संकट आहे. ही वेळ केवळ आपल्यावरच आलेली नाही. या संकटावर नेमकेपणाने बोलणारे किंवा सल्ला देणारे जगात कुणी नाही. एकीकडे लॉकडाऊनला विरोध करणारे शहाणे आहेत. लॉकडाऊनमुळे काय साधले, त्यामुळे अर्थव्यवस्थेवर संकट आले आहे, असा दावा केला जात आहे.  मी लॉकडाऊन उघडून देतो. पण इथे लोक मृत्युमुखी पडले तर तुम्ही त्याची जबाबदारी घेणार का. आज जे दार उघडा म्हणून सरकारदरबारी बसलेत टाहो फोडताहेत, त्यांच्यासाठी दारे उघडायला हरकत नाही. पण दारं उघडल्यानंतर तुम्ही जबाबदारी घेणार का, अर्थव्यवस्थेवर आलेल्या संकटाची जाणीव आम्हालाही आहेच.

आपण मिशन बिगीन अगेन करताना ते नीट समजावून घेतले पाहिजे. लॉकडाऊन केलेला आहेच. मात्र आपण त्यातून एकएक गोष्ट सोडवत चाललो आहोत. हळूहळू शिथिल करतोय. नाहीतर लॉकडाऊन वन, लॉकडाऊन टू आणि अनलॉक टूमध्येच आपण अडकून पडू. तुम्ही घाईघाईने लॉकडाऊन केला तर ते चुकीचे आहे. तसेच घाईघाईने अनलॉक केला तर तेही चुकीचे ठरेल. लॉकडाऊनला लोक कंटाळले आहेत. पोटापाण्याचा प्र्श्न आहे हे खरेच आहे. मात्र त्यासाठी घाईगडबडीने एकदम सर्व काही उघडले आणि साथ प्रचंड वाढली, त्यात लोकांचा जीव गेला तर पोटापाण्याचं काय करणार, कारखान्यांमध्ये ही साथ घुसली तर काय होणार. लोकं मरतील तेवढी मरू दे, लॉकडाऊन नको, असं करायला तुमची तयारी आहे का? असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू

नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

टॅग्स :उद्धव ठाकरेशरद पवारअयोध्याराम मंदिरराजकारण