नवी दिल्ली - आषाढी एकादशीनिमित्ती विठूरायाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात पार पडली. यावेळी चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. मुंबईतून पंढरपूरलामुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत गेले. त्यानंतर तेथील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावाही घेतला. मात्र, यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका करताना, मुख्यमंत्र्यांना चालक संबोधित लक्ष्य केले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान पाऊस असताना, समोरची दृष्यमानता कमी असतानाही, मुख्यमंत्र्यांनी सफाईदारपणे गाडी चालवत पंढरपूर गाठले. यावेळी, मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी रश्मी ठाकरेही शेजारच्या सीटवर होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री ९ च्या सुमारास पंढरपुरात पोहोचले. मुख्यमंत्री विमानानं मुंबईतून सोलापूरला जाऊ शकत होते. मात्र सध्याचं हवामान आणि दृश्यमानता कमी असल्याने ते रस्ते मार्गे पंढरपूरकडे पोहोचले. मुख्यमंत्र्यांच्या या प्रवासानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. माननीय मुख्यमंत्री हे जनतेचे पालक असतात, ते गाडीचे चालक असत नाहीत. परंतु, यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दारातही सुटत नाही, असे म्हणत अभंगातून मुख्यमंत्र्यांनाही पडळकरांनी लक्ष्य केलंय.
हायकोर्टाकडून मुख्य सचिवांना हजर राहण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाली असून अखंड ओबीसी समाजाचं वाटोळं करण्याचं पाप राज्य सरकारने केल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच, आता पंतप्रधान गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची आहे. राज्य सरकारला फक्त या योजनेची अंमलबजावणी करायची आहे, ती अंमलात आणायची आहे. पण, असे असतानाही उच्च न्यायालयात राज्य सरकारने 5 वेळा तारखा मागितल्या. उच्च न्यायालयाने अंमलात आणण्याची तंबी दिली. तरीही, ठाकरे सरकार जबाबदारीपासून पळतंय. शेवटी उच्च न्यायालयाने झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारच्या राज्याचे चीफ सेक्रेटरी यांना कोर्टात हजर रहायला सांगितलय. पण, गेंड्याचं कातडी पांघरलेलं सरकार याकडे लक्ष देत नाहीत, असे पडळकरयांनी म्हटले.
जपाचे निमित्त झोपेचा पसर, देहाचा विसर पाडुनियाऐसै ते भजन अमंगळवाणी, सोंग संपादनी बहुरुप्याचेसेवेसी विकळ देहाचियी असे, तया कुठे असे देव उरला...तुका म्हणे मानस्तंभ जया चित्ती, तयाची प्रचिती करू आम्हीअसा तुकाराम महाराजांचा अभंग म्हणत गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारवर टीका केली आहे.
निलेश राणेंचीही टीका
मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवून पंढरपूरला जाणे यात कौतुक काय?, स्वत: गाडी चालवल्यामुळे महाराष्ट्राला पैसे मिळाले, की महाराष्ट्रातून कोरोना गेला?, असा प्रश्न निलेश राणेंनी विचारला आहे. तसेच, राज्यातील पूरपरिस्थिती, मुंबई तुंबलीय, दुर्घटना याचं डॅमेज कंट्रोल कसं होतंय, याची माहिती काढण्यासाठी तरी मुख्यमंत्र्यांनी मागच्या सीटवर बसायला हवं होतं. तुम्हाला रिझल्ट देण्यासाठी खुर्चीवर बसवलंय, गाडी चालविण्यासाठी नाही, अशी टीका राणेंनी केली. विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही कारण इतक्या सहजपणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही, असेही राणेंनी म्हटले.
तर लोटांगण घातलं असतं
स्वतः ड्रायव्हिंग करत शनिवारी चेंबूरपर्यत गेले असते तर लोटांगण घातलं असतं, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. तसेच याआधी, मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..., असे ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन टीका केली होती.