मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकू नका, उद्धव ठाकरेंनी भाजपाला खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 03:26 PM2020-11-08T15:26:45+5:302020-11-08T15:30:21+5:30

Uddhav Thackeray News : मुंबई मेट्रोची आरे येथील नियोजिक कारशेड रद्द करून ती कांजूरमार्गला हलवण्याच्या निर्णयावरून सध्या राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा आमनेसामने आलेले आहे.

Uddhav Thackeray Criticises BJP for Kanjurmarg Metro Car Shed issue | मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकू नका, उद्धव ठाकरेंनी भाजपाला खडसावले

मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकू नका, उद्धव ठाकरेंनी भाजपाला खडसावले

Next
ठळक मुद्देआरे येथील कारशेड कांजूरमार्गला नेली म्हणून टीका होत आहे. ती जमीन मिठागराची आहे, असा दावा केला जातोय जे जे मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचे असेल ते ते काम आम्ही करणार आहोत आम्हीसुद्धा डोळे बंद करून काम करत नाही आहोत

मुंबई - मुंबई मेट्रोची आरे येथील नियोजिक कारशेड रद्द करून ती कांजूरमार्गला हलवण्याच्या निर्णयावरून सध्या राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा आमनेसामने आलेले आहे. एकीकडे आरे येथील कारशेड रद्द करून कांजूरमार्ग येथे कारशेडच्या कामास सुरुवात झाली असतानाच कांजूरमार्ग येथील जागा ही मिठागराची जागा असून, तिच्यावर आपली मालकी असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आरे येथील कारशेड कांजूरमार्गला नेली म्हणून टीका होत आहे. ती जमीन मिठागराची आहे, असा दावा केला जातोय. या सगळ्याला समर्पक उत्तर देऊ. मात्र असं करून तुम्ही मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकता आहात. त्याचा काय इलाज करायचा तो करूच. पण आम्हीसुद्धा डोळे बंद करून काम करत नाही आहोत. तसेच जे जे मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचे असेल ते ते काम आम्ही करणार आहोत.

मधल्या काळात महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान केले होते. जगभर, देशात, राज्यात संकट असताना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नाही. ड्रग्सची शेती केली जातेय असे वातावरण निर्माण केले गेले होते. ते आपण मोडून काढले आहे. हे कारस्थान मोडून काढून आम्ही जून महिन्यात १७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले. अनेक देशी-विदेशी कंपन्या आल्या. त्यापैकी अनेक कंपन्यांना जागा दिल्या आहे. गेल्या आठवड्यात अजून ३५ हजार कोटींची गुंतवणूक आली आहे, असेही उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला संबोधित करताना सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले. मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मंदिरे कधी उघडणार असा सवाल सातत्याने विचारला जात आहे. आता मंदिरंसुद्धा उघडली जातील. दिवाळीनंतर आपण मंदिरे उघडण्याबाबत एक नियमावली करू. या नियमावलीमध्ये काय असेल तर गर्दी टाळली जावी. आपले आजी आजोबा, आई-वडील अशा वृद्ध व्यक्ती मंदिरात जातात. तिथे गर्दी होऊ शकते. त्यामुळे धोका वाढू शकतो म्हणूनच मी जाणीवपूर्वक मंदिरे उघडण्यासाठी उशीर करत आहे.

Web Title: Uddhav Thackeray Criticises BJP for Kanjurmarg Metro Car Shed issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.