“छत्रपतींच्या स्मारकाबाबत स्मरण करून द्यावे लागणे दुर्दैवी, ‘वाघ्या’चं तर...”: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:16 IST2025-03-27T14:15:27+5:302025-03-27T14:16:22+5:30

Uddhav Thackeray PC News: समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर पाणी सोडले का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसेच रायगडावरील वाघ्या श्वानाच्या समाधीबाबत स्पष्ट भाष्य केले आहे.

uddhav thackeray criticized pm modi and state govt over chhatrapati shivaji maharaj statue in sea | “छत्रपतींच्या स्मारकाबाबत स्मरण करून द्यावे लागणे दुर्दैवी, ‘वाघ्या’चं तर...”: उद्धव ठाकरे

“छत्रपतींच्या स्मारकाबाबत स्मरण करून द्यावे लागणे दुर्दैवी, ‘वाघ्या’चं तर...”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray PC News: आता आपटे कुठे आहेत? अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरनंतर संचालक कुठे आहेत. त्यांच्याबद्दल काहीच बोलले जात नाही. सोलापूरकर कुठे आहे. कोरटकर याच्याबद्दल दोन दिवस चालेल. नंतर बंद होईल. गद्दार म्हटल्यावर कामरानचा स्टुडिओ तोडता. दोन-दोन समन्स पाठवता आणि सोलापूरकरला एकही समन्स नाही. तुम्ही कुणाचा आदर्श ठेवता शिवाजी महाराजांचा की खंडोजी खोपडेचा? प्रचंड बहुमत मिळालेले अस्वस्थ सरकार आहे, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

"अधिवेशनाने देशाला उत्तम गाणं दिलं मान्य करावं लागेल"; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणापासून ते रायगडावरील वाघ्या श्वानाच्या स्मारकापर्यंत अनेक मुद्द्यांवर परखड शब्दांत भाष्य केले. त्यांनी हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे. त्यांना माझ्यावर आरोप करण्याचा अधिकार नाही. मी हिंदुत्व सोडल्याचे म्हणण्याचा अधिकार नाही. आता त्यांनी हिंदुत्व सोडले. ‘एक है तो सेफ है’, ‘बटेंगे तो कटेंगे’, भाजपनेच हिंदुत्व सोडले तर हिंदू सेफ आहे की नाही. जे हिंदूत्वाचे रक्षक आहेत ते कसे मशिदीत जाऊन सौगात देतात ते पाहायचे आहे, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.

छत्रपतींच्या स्मारकाबाबत स्मरण करून द्यावे लागणे दुर्दैवी

रायगडावर वाघ्या श्वानाचे स्मारक आहे. त्याबाबत एक समिती स्थापन करा. ती समाधी ठेवायची तर ठेवा, उखडायची तर उखडा. परंतु त्याच्यावरून पेटवापेटवी करण्याआधी अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत कोणी पेटून का उठत नाही? मला प्रश्न पडतो की, मोदींच्या हस्ते जलपूजन झाले. त्याचे काय करायचे. स्मारकावर पाणी सोडले का? मी मोदींना स्मरण करून देणारा कोण? छत्रपतींच्या स्मारकाबाबत स्मरण करून द्यावे लागते यापेक्षा दुसरे दुर्देव काय. हे हिंदुत्वाबाबत काय बोलायचे. ज्यांना स्मारकाचे काही पडले नाही. ते कोरटकर, कोश्यारी आणि सोलापूरकरवर काय कारवाई करणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. 

दरम्यान, जयंत पाटील यांनी काल म्हटले की या अधिवेशनाचे फलित काय? या अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिले यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाला उत्तम गाणे दिले हे आपल्याला मान्य करावे लागेल. हे गाणे आज देशातल्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येकाच्या मनात गुणगुणले जात आहे. हे अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत नेणारे होते बाकी काहीच नाही. असे अधिवेशन का घेतले आणि त्यातून आपण काय दिले असा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

 

Web Title: uddhav thackeray criticized pm modi and state govt over chhatrapati shivaji maharaj statue in sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.