'उद्धव ठाकरेंनी राज्याच्या १२ कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, ना दहीहंडीच्या'; मोहित कंबोज यांचा हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 09:40 AM2022-09-10T09:40:47+5:302022-09-10T09:41:22+5:30

राज्यात लाडक्या बाप्पाला भाविकांनी साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला. दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पांचं मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आलं.

Uddhav Thackeray did not wish Ganeshotsav or Dahi Handi tweet by mohit kamboj | 'उद्धव ठाकरेंनी राज्याच्या १२ कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, ना दहीहंडीच्या'; मोहित कंबोज यांचा हल्लाबोल!

'उद्धव ठाकरेंनी राज्याच्या १२ कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, ना दहीहंडीच्या'; मोहित कंबोज यांचा हल्लाबोल!

googlenewsNext

मुंबई-

राज्यात लाडक्या बाप्पाला भाविकांनी साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला. दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पांचं मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आलं. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्बंधात साजरा झालेला उत्सव यावेळी मात्र निर्बंधमुक्त आणि मोठ्या जल्लोषात साजरा झाला. उत्सवात यावेळी राजकीय रंग देखील पाहायला मिळाला. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून गणेश दर्शनाच्या माध्यमातून मंडळांना भेटीगाठी दिल्या गेल्या. भाजपाचे नेते आणि ज्यांच्या ट्विटची दखल प्रत्येक जण घेऊ लागला आहे असे मोहित कंबोज यांनी आज एक नवं ट्विट केलं आहे. 

तब्बल २३ तासांनी 'लालबागच्या राजा'चं विसर्जन; अलोट गर्दीत भक्तांचे डोळे पाणावले

मोहित कंबोज यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांनी यावेळी गणेशोत्सव असो किंवा दहीहंडी दोन्ही सणांच्या शुभेच्छा जनतेला दिल्या नाहीत याची आठवण करुन दिली आहे. 

"श्री उद्धव ठाकरे जी यांनी यावेळी राज्याच्या १२ कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, ना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. पण २.५ वर्षांनंतर हिंदुंनी यावेळी ज्या जल्लोषात उत्सव साजरा केला. त्यासाठी मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हर हर महादेव", असं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. 

राज्यात मोठ्या जल्लोषात बाप्पाचं विसर्जन
निर्बंधमुक्त उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावेळी राज्यात सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. तब्बल २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन गिरगाव चौपाटीवर करण्यात आलं. तर पुण्यातही दुसरा दिवस उजाडला तरी विसर्जन मिरवणुका अजूनही सुरूच आहेत. 

 

Web Title: Uddhav Thackeray did not wish Ganeshotsav or Dahi Handi tweet by mohit kamboj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.