उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज
By Admin | Published: May 13, 2016 03:41 AM2016-05-13T03:41:54+5:302016-05-13T03:41:54+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गुरुवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गुरुवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. उद्धव यांना नियमित तपासणीसाठी बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उद्धव हे शारीरिकदृष्ट्या सक्षम असून, ते आपला दिनक्रम, व्यायाम नियमितपणे करू शकतात, असे रुग्णालयाचे कार्डिओलॉजिस्ट
डॉ. मॅथ्यू सॅम्युअल यांनी सांगितले.
उद्धव यांना बुधवारी रुग्णालयात दाखल केल्यावर कार्डिओलॉजिस्ट डॉ. मॅथ्यू आणि
डॉ. अजित मेनन यांनी अॅन्जिओग्राफी केली. पण, ही अॅन्जिओग्राफी म्हणजे त्यांचा फॉलोअप चेकअप असल्याचे डॉ. मॅथ्यू यांनी स्पष्ट केले. २०१२मध्ये उद्धव यांच्यावर लीलावती रुग्णालयात अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. या तपासणीनंतर त्यांच्या हृदयाची स्थिती पूर्णत: सामान्य आहे. हृदयातील स्टेण्टही योग्य स्थितीत असून, कोणतेही ब्लॉकेजेस् नाहीत.
ते कोणताही दौरा सहज करू शकतात. पण, त्याचवेळी व्यायाम, संतुलित आहार आणि पथ्ये त्यांना पाळावी लागणार असल्याचे डॉ. मॅथ्यू यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)