Join us

"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 5:27 PM

Uddhav Thackeray : शिंदे गटातील नेत्याने उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

Uddhav Thackeray, Narendra Modi ( Marathi News ) :  लोकसभा निवडणुकीतील मतदान संपले आहे, ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले. यात एनडीए सत्तेत येऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. या पोलमध्ये ठाकरे गटाला राज्यात जास्त जागा मिळू शकतात, असंही वर्तवले आहे. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

"निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी मोदी साहेबांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. पण, त्यांना ती वेळ मिळू शकली नाही, असा मोठा गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर यांनी केला. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत बोलले आहेत त्यावरुन ते त्यांना माफ करतील का नाही हे सांगता येत नाही. कारण नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत महाराष्ट्रामध्येच बोलले आहेत, असंही दीपक केसरकर म्हणाले. 

"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट

"गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे यांना एनडीए मध्ये यायचे आहे, यासाठी ते विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मेसेज पाठवत आहे, असा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना केला आहे. या बाबतीमुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. 

"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत दिसतील; आमदार रवी राणा

"उद्धव ठाकरे निकालानंतर २० दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसतील, असा आमदार   रवी राणा यांनी केला आहे. "एक्झिट पोलचे आकडे आज आले आहेत. ज्या दिवशी निवडणुका झाल्या त्याच दिवशी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. त्यामुळे त्याच दिवशी आम्हाला निकाल माहित होता. म्हणून नवनीत राणा २ लाखांनी निवडून येणार हा आमचा दावा आहे, असंही रवी राणा म्हणाले. 

"निवडणुकीच्या निकालानंतर वीस दिवसांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत येणार, मोदीजींनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी जी खिडकी उघडून ठेवली आहे त्या खिडकीतून उद्धव ठाकरे येतील. मोदीजींनी आधीच सांगितलं आहे की, उद्धव ठाकरे यांच्यासाठी बाळासाहेब यांचे सुपूत्र म्हणून माझी नेहमी त्यांच्यासाठी एक खिडकी उघडी आहे. मी दाव्याने सांगतो, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर वीस दिवसातच उद्धव ठाकरे सरकारमध्ये दिसतील, कारण येणारा काळच देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदीजी आहेत हे उद्धव ठाकरे यांना माहित आहे, असा मोठा गौप्यस्फोट आमदार रवी राणा यांनी केला. 

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेदीपक केसरकरनरेंद्र मोदी