मुंबई- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांवरील बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांचं प्रकरणाची सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित झालं आहे. गौरी भिडे यांच्या याचिकेवर ८ डिसेंबर रोजी न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझेस यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा गंभीर आरोप करत गौरी भिडे यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची सीबीआय आणि ईडीद्वारे चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर २२ नोव्हेंबरला सुनावणी पार पडली होती. उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. २२ नोव्हेंबरला पार पडलेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. न्या. दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा गौरी भिडेंची नव्या खंडपीठापुढे धाव घेतली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"