Join us

उद्धव ठाकरे यांनी घेतली जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक

By मनोहर कुंभेजकर | Published: June 10, 2024 5:01 PM

येथील मतमोजणीत  शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी ४५२६४४ मते मिळाली. तर उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर  यांना ४५२५९६ मते मिळाली.

मुंबई - २७ उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात  शिंदे सेनेचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर  यांनी टपाल मतमोजणीत ४८ मतांनी बाजी मारत उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला.हा पराभव उद्धव सेनेच्या जिव्हारी लागला आहे.

येथील मतमोजणीत  शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी ४५२६४४ मते मिळाली. तर उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर  यांना ४५२५९६ मते मिळाली.येथील निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलेला निकाल हा संशयास्पद असून या निकाला विरोधात उद्धव सेना न्यायालयात दाद मागणार आहे.

या संदर्भात काल दुपारी मातोश्रीत उद्धव सेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्धव सेनेच्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक घेतली.यावेळी शिवसेना नेते,माजी मंत्री आदित्य ठाकरे,माजी मंत्री,शिवसेना नेते डॉ.अनिल परब,शिवसेना नेते,आमदार सुनील प्रभू,अमोल कीर्तिकर तसेच येथील विधानसभा संघटक,विधानसभा समन्वयक,उपविभाग प्रमुख,शाखाप्रमुख,उपशाखा प्रमुख आदी पुरुष व महिला उपस्थित होत्या.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रात अमोल कीर्तिकर यांना ८३४०९ तर वायकर यांना ७२११८ मते मिळाली आहे.

यावेळी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतांना म्हणाले की,शिवसैनिकांनी चांगली मेहनत घेतली आहे.नाउमेद न होता जोमाने कामाला लागा.शिवसैनिकांनी आपल्या भागा भागात फिरा,ज्याठिकाणी आपली हक्काची मते होती,पण आपण पोहचू शकलो नाही,तिकडे पोहचून तेथील नागरिकांशी संपर्क साधा.मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडवा.जर वेळ पडली तर मला बोलवा,मी नागरिकांशी संपर्क साधेल अश्या महत्वाच्या सूचना त्यांनी केल्या.

 उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमुळे शिवसैनिक आपला उत्साह कायम ठेवत पुन्हा जोमाने कामाला लागतील आणि आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकीत उद्धव सेनेला यश मिळवून देतील अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये होती. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना