मुंबई- उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपाला खडे बोल सुनावले. 11 पैकी 2 जागा सोडल्या तर इतर जागांवर भाजपाचा पराभव झालेला आहे. 2014साली एका पक्षाचं बहुमताचं सरकार आलं. आज त्या सरकारला चार वर्षं पूर्ण झाली. 25 वर्षांचं सरकार 4 वर्षात खाली आलेलं आहे. पहिल्यांदाच पालघरची लोकसभा शिवसेनेनं लढवली होती. निवडणूक लढवायची की नाही द्विधा मनस्थितीत असतानाच वनगा परिवारावर झालेल्या अन्यायातून पालघर निवडणूक शिवसेनेन ताकदीनं लढवली. 8 लाख 87 हजार लोकांना मतदान केलं. 6 लाख लोकांनी भाजपाला नाकारलं. शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतो. शिवसेनेनं ही निवडणूक पहिल्यांदा लढवली. इथे घराघरात धनुष्यबान पोहोचला आहे. भाजपाला आता मित्रांची गरज नाही. योगीनं शिवसेनेचा जो अपमान केला, तो भाजपाला मान्य आहे का, याचा भाजपानं आधी खुलासा करावा. योगी आदित्यनाथांनी शिवरायांचा अपमान केला, मात्र अपमान झाला तरी आम्हाला विजय हवा, ही भाजपाची भूमिका होती. भाजपाच्या शिवभक्तीवर संशय उभा राहतोय.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे- बुलेट ट्रेन, अहमदाबाद एक्स्प्रेस वे अशा कोणत्याही कामाला विरोध असेल, तर जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभं राहू - पालघर निवडणुकीत पराभव झाल्याचं जाहीर झालं आहे, पण मी पराभव मान्य करत नाही- काही जणांना पैसे वाटताना पकडलं, एका रात्रीत लाखभर मतं कशी वाढली ह्याचे पुरावे द्या- निवडणूक आयुक्तपदासाठीही निवडणूक घ्या- आम्ही यापुढे स्वबळावरच लढणार - शिवसेनेचं पालघरमध्ये काम सुरूच राहिल- मतदान यंत्रणेचा एकदाचा सोक्ष मोक्ष लावा - हा पराभव मानायला आम्ही तयार नाही, हा साम दाम दंड भेद या धोरणाचा विजय - पालघरमध्ये भाजपच्या काही लोकांना पैसै वाटताना पकडलं, त्यांच्या विरूद्ध तक्रार नोंदवली गेली नाही- रात्रभरात लाखभर मत वाढतातच कशी, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं- पालघरमधली निवडणूक यंत्रणा पक्षपात करणारी- भाजपच्या शिवभक्तीवर आता संशय येतोय- निवडणूक आयोगाला राजकीय पक्षांना लोकशाहीचे धडे देण्याचा अधिकार नाही- ही कार्यपद्धती लोकशाहीला घातक- निवडणूक आयोगाला लोकशाहीची बुज असेल तर पालघरमधल्या प्रकरणाचा छडा लावा. तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करा- पालघरमध्ये ईव्हीएम बंद पडली, निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीयांनी तक्रार करायला हवी - मतदान यंत्रं ऐनवेळी बंद पडतात, निवडणूक यंत्रणा बिघडलेली, निवडणूक यंत्रणा ही देखील भ्रष्ट आहे - योगी आदित्यनाथांनी शिवरायांचा अपमान केला, मात्र अपमान झाला तरी आम्हाला विजय हवा, ही भाजपची भूमिका होती - उत्तर प्रदेशच्या जनतेने योगी आदित्यनाथ यांची मस्ती उतरवली