शाब्बास! राणेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 10:07 AM2021-08-25T10:07:46+5:302021-08-25T10:09:41+5:30

Narayan Rane vs Shivsena: नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर युवासैनिकांनी केलेल्या आंदोलनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. याठिकाणी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात युवासैनिकांनी जोरदार आंदोलन केलं.

Uddhav Thackeray meets yuvasena mumbai protesting outside narayan Ranes bungalow | शाब्बास! राणेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी

शाब्बास! राणेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी

googlenewsNext

Narayan Rane vs Shivsena: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर काल दिवसभर राज्यभर शिवसेनेकडून आंदोलनं आणि निदर्शनं झाली. यात राणेंना अटक झाली आणि रात्री उशिरा त्यांची जामीनावर सुटका झाली. यात मुंबईत जुहू येथे नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर युवासैनिकांनी केलेल्या आंदोलनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. याठिकाणी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात युवासैनिकांनी जोरदार आंदोलन केलं. यात राणे समर्थक आणि युवासैनिकांमध्ये राडाही झाला. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता. 

...अन् असे घडले अटकनाट्य! भाजपची खेळी फसली; राणे ट्रॅपमध्ये सापडले

आमदार नितेश राणे यांचं आव्हान स्वीकारुन वरुण सरदेसाई कार्यकर्त्यांसह राणेंच्या बंगल्याबाहेर जाऊन घोषणाबाजी करत होते. यात पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान काही कार्यकर्ते देखील जखमी झाले होते. दरम्यान, युवासेनेच्या याच कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची रात्री उशिरा भेट घेतली. वरुण देसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे यांची 'वर्षा' येथे भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाइल आंदोलन केलेल्या युवासैनिकांचं पाठ थोपटून कौतुक केल्याची माहिती समोर आली आहे. 

नारायण राणेंवरील कारवाईवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची होती बारीक नजर, वर्षावरून असे घेत होते अपडेट 

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबतच्या या बैठकीत आंदोलन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबतही माहिती देण्यात आल्याचं कळतं. यासोबत आंदोलनाची सविस्तर माहिती आदित्य ठाकरेंना देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईत विविध ठिकाणी राडा आणि दगडफेक केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Web Title: Uddhav Thackeray meets yuvasena mumbai protesting outside narayan Ranes bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.