मुंबई : भाजपचे आमदार फोडायचे, देवेंद्र फडणवीस यांना अटक करायची, असा उद्धव ठाकरे यांचा डाव होता, असा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला. लोकसभेची रणधुमाळी जोमात असताना लोकमत व्हिडीओजचे संपादक आशिष जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वच प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली.
महाराष्ट्रात २०२४ ची म लोकसभा निवडणूक महायुतीतर्फे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली जात आहे. विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जात आहे, पण हिंदुत्वाचा मुद्दाही महत्त्वाचा असल्याचे शिंदे यांनी मुलाखतीत म्हटले आहे.
बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना खरी शिवसेना आहे. धनुष्यबाण आमच्याकडे आहे. बाळासाहेब ठाकरेंना नको होते, तेच उद्धव ठाकरेंनी स्वीकारले. ठाकरे यांच्याकडून काँग्रेसची भाषा बोलली जात आहे. सावरकरांबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी कथी तडजोड केली नाही. त्यामुळे नकली शिवसेना हे केलेले वक्तव्य खरे आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यावेळेस मी सरकारमध्ये होतो. भाजपच्या चार-पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कार्यक्रम तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी हाती घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची पूर्ण तयारी तेव्हा करण्यात आली होती. भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचा ठाकरे यांचा डाव होता, पक्ष गेला, शिवसैनिक गेले, याबद्दल त्यांना काही घेणे- देणे नव्हते. अशा परिस्थितीत मला त्यांच्यासोबत थांबणे शक्य नव्हते, मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. हे कारस्थान करताना माझाही कार्यक्रम करण्याचा विचार सुरू होता. मला हे सगळे कारस्थान हाणून पाडायचे होते आणि जनतेने जो भाजप शिवसेनेला कौल दिला होता, ते सरकार स्थापन करायचे होते, म्हणून बंडाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी जबाबदारी दिली व देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केले. बाळासाहेब ठाकरे सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, तर उद्धव ठाकरे हे घरगड्यासारखी वागणूक देतात. राजकारणात है चालत नाही. पक्ष मोठा होत नाही, असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला.
कामांसाठी ईगो बाजूला ठेवायला पाहिजे होता
जे काम मोदीजींनी केले ते काँग्रेसने साठ वर्षात केले नाही. आम्ही विकासावर ही निवडणूक लढवत आहे. अटल सेतु, मुंबईतील मेट्रो ही। कामे मोदींनी केली. लोकांच्या मनातील आलेल्या सरकारमुळे कामे मार्गी लागली आहेत. आमचे सरकार येण्याआधी यांच्या ईगोमुळे कामे अडकली होती. लोकांच्या कामासाठी यांनी ईगो बाजूला ठेवायला पाहिजे होता, असा टोलाही शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
...तेव्हा हिंदुत्व हिंदुत्व म्हणणारे शांत बसले होते
माझे एक प्रामाणिक मत आहे, जेव्हा आम्ही महाविकास आघाडीत होतो तेव्हा सावरकरांविरुद्ध काँग्रेसने अपशब्द वापरले होते. तेव्हा हिंदुत्व हिंदूत्व म्हणणारे शांत यसले होते. त्यांना सावरकर नको आहेत, त्यांना औरंगजेब चालतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव. म्हणून आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही बाळासाहेबाचे विचार सोडले, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
बाळासाहेबांचे विचार कोणाकडे? धनुष्यबाण कोणाकडे? उद्धव ठाकरे कॉंग्रेसची भाषा बोलू लागले, काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. त्यामुळे याळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत? धनुष्यवाण कोणाकडे आहे? असा सवालही शिंदे यांनी केला. महायुतीमध्ये जागावाटपात कटुता नव्हती. आम्ही एका मतदारसंघात दोन दोन उमेदवार उभे केले नाहीत. असा टोलाही शिंदे यांनी लगावला.
रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांना उमेदवारी का?
रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांच्यावर आरोप झाले, त्यांची चौकशी झाली. त्यांनाच शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांची चौकशी झाली, म्हणजे ते आरोपी नाहीत. त्यांच्या केसचा अभ्यास करून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची खरोखर चूक असती, तर आपण वेगळा निर्णय घेतला असता, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख रवींद्र वायकराच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. त्यांच्या परिवारावर आले की ते बघतात, कार्यकर्ता जेलमध्ये गेला तरी चालेल, मग हे कसले प्रमुख, कसले नेते, असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला. रवींद वायकरांना बोलावले नाही, ते स्वतः आले, तेव्हा गैरसमज दूर झाले, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ते आधीच काँग्रेससमोर लीन... विलीनीकरण बाकी
शरद पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरे आणि पवारांना ऑफर दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. कमजोर झालेल्या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा भाजप हा चागला मार्ग आहे, असा पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा अर्थ असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरेंची सेना आधीच काँग्रेससमोर लीन झाली आहे. आता फक्त विलीनीकरण बाकी आहे, असा टोला त्यांनी लगावला.
मराठा आरक्षण टिकेल
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन राजकीय नाही, तर सामाजिक होते, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले, तसेच मराठा समाजाला महायुतीच्या सरकारने दिलेले आरक्षण कोर्टात टिकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला, तसेच है आरक्षण कोर्टामध्ये अडकाव, यासाठी कोण कोर्टात गेले, हेही आम्हाला माहिती आहे. असेही मुख्टामंख्यांनी यावेळी सांगितले.