Join us  

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा अर्ज फेटाळला; शेवाळे यांचा दंडाधिकारी न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:49 AM

शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांनी दैनिकामध्ये बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याचा दावा करीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मुखपत्रातून बदनामी केल्याच्या आरोपावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी दोषमुक्ततेसाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी माझगाव येथील दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला. या अर्जाला राहुल शेवाळे यांच्यावतीने सोमवारी विरोध दर्शवित याचिका अर्थहीन असून ती फेटाळून लावावी, अशी मागणी करण्यात आली.

शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांनी दैनिकामध्ये बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याचा दावा करीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. कथित आरोपांप्रकरणी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी कुठलेही पुरावे नाहीत.  

सुनावणी तहकूब  माझगाव येथील दंडाधिकारी एस. बी. काळे यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली.   त्यावेळी शेवाळे यांच्या वतीने ॲड. चित्रा साळुंखे यांच्यावतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.   शेवाळे यांच्यावतीने उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या अर्जाला विरोध करण्यात आला.   या प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती, पाहता आरोपी अर्जात विनंती केल्याप्रमाणे दिलासा मिळण्यास पात्र नाही त्यामुळे दंडासह याचिका फेटाळून लावण्यात आली.   न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी २३ नोव्हेंबर पर्यंत तहकूब केली.

टॅग्स :राहुल शेवाळेउद्धव ठाकरेसंजय राऊत