Join us

उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावे टार्गेट कोण ते...; नाना पटोलेंवरून प्रकाश आंबेडकरांचे मोठे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 9:13 AM

ईडी चौकशी करुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना हा इशारा दिला आहे.

मुंबई- महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन आता बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोलं यांच्या संदर्भात वक्तव्य केले आहे. यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, नाना पटोले यांचे इंग्रजी चित्रपटा प्रमाणे हवा कधी गरम, हवा कधी नरम अशी वक्तव्ये करतात. अशा रितीने ते वक्तव्य करतात. नागपूरमध्ये त्यांनी स्वत: वेगळं लढणार असं म्हणत आहेत, आणि महाविकास आघाडीमध्ये असल्यावर एकत्र लढणार असं म्हणतात. त्यामुळे हा गुमराह करण्याचा भाग आहे त्याच टारगेट कोण आहे हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्याव, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

नवीन संसद भवनाच्या उद्धाटन सोहळ्यासाठी ४ विरोधी पक्षांनी दिली मोदी सरकारला साथ

ईडी चौकशी करुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना हा इशारा दिला आहे. काही दिवसापूर्वी जयंत पाटील यांची चौकशी केली. तुम्ही बीजेपी मध्ये या नाहीतर जेलमध्ये जा असं बोलतील. आता ईडीच्या टारगेटवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.आता पॉलिटीकल ईडीमध्ये वीक राष्ट्रवादी पक्ष आहे असं मला वाटते, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

केजरीवाल यांच्या संदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले, अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या परिस्थितीशी मी शिपताईज आहे त्यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा नाही. जेव्हा दिल्ली नॅशनल कॅपिटल करण्याचं बिल आलं होतं तेव्हा राज्यसभेमध्ये मी एकटा मेंबर होतो की ज्यांनी असताना विरोध केला होता, असंही आंबेडकर म्हणाले. 

नव्या संसदेच्या उद्धाटन समारंभावरुन बोलताना आंबेडकर म्हणाले, आता सगळ्यांनी मोदींनी उद्धाटन करण्याला विरोध केला आहे. पण जर उद्या बीजेपी सत्तेवरन गेली तर मी सांगतो पार्लमेंट मधला तो स्टोन काढला जाईल आणि त्याचं पुन्हा उद्घाटन केलं जाईल.राष्ट्रपती मुर्मु यांचा स्टोन तिकडे लागला जाईल आणि ओन्ली मुर्मु असं तिकडे राहील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :प्रकाश आंबेडकरउद्धव ठाकरेनाना पटोले