भाजपाचा खिलजी ह'राम' कदमला उखडून फेका - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 09:44 IST2018-09-07T07:50:46+5:302018-09-07T09:44:38+5:30
मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन भाजपाचे राम कदम यांच्यावर चौफेर सडकून टीका होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राम कदम यांच्यावर सामना संपादकीयमधून सडकून टीका केली आहे.

भाजपाचा खिलजी ह'राम' कदमला उखडून फेका - उद्धव ठाकरे
मुंबई - मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन भाजपाचेराम कदम यांच्यावर चौफेर सडकून टीका होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राम कदम यांच्यावर सामना संपादकीयमधून सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राम कदमांचा उल्लेख हराम कदम असा करत बोचऱ्या शब्दांत खडेबोल सुनावले आहेत. ''जिभेचे पट्टे चालविणारे स्त्रियांना पळवून नेणाऱ्या आपल्या आमदाराच्या बेताल बडबडीवर तोंड शिवून बसले आहेत. महाराष्ट्र धर्म बुडाला आहे तो पापी औरंग्यामुळे नव्हे, तर भाजपच्या विकृतीमुळे. ही विकृतीच मुळापासून उखडून फेका. लिंगपिसाटांचे राजकारण संपवायला हवे'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राम कदमांवर सडकून टीका केली आहे.
सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे -
- आजच्या युगातही भाजपच्या ‘खिलजी’विरोधात जोहार पत्करण्याची वेळ महाराष्ट्रातील तमाम मायभगिनींवर आली आहे काय?
- भाजपचे एक आमदार व मुख्यमंत्र्यांचे प्रिय ‘हराम’ कदम यांनी स्त्रीयांच्या बाबतीत अर्वाच्य, मानहानीकारक शब्द उच्चारून मस्तवालपणाचे प्रदर्शन केले आहे. दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी अत्यंत रुबाबात माईकवरून जाहीर केले की, ‘‘कोणती मुलगी आवडली असेल तर फक्त मला येऊन सांगा. त्या मुलीस उचलून तुमच्या हवाली करतो.’’ ही कसली भोगशाही आमच्या महाराष्ट्रात अवतरली आहे?
- आई-भगिनी, शेतकरी, सीमेवरील जवानांच्या पत्नींबाबत घाणेरडय़ा शब्दांत उद्धार करणारी जमात भारतीय जनता पक्षात रुजली आहे.
( राम कदम यांची जीभ छाटा, आणि पाच लाख रुपये मिळवा, माजी मंत्र्याचे चिथावणीखोर वक्तव्य )
#WATCH: Former Maharashtra minister and Congress leader Subodh Savji says ‘I am announcing a Rs 5-lakh reward for anyone who chops off BJP MLA Ram Kadam’s tongue. I strongly condemn him saying girls should be abducted.' (06.09.18) pic.twitter.com/Y3h8AR7Vd1
— ANI (@ANI) September 7, 2018
- सगळय़ांवर आमदार कदम यांनी हरामखोरीचा कळस चढवला आहे. दुसऱ्यांच्या बायका, लेकी, सुना पळवून आणू असे सांगणारा आमदार ज्या पक्षात आजही आहे त्यांना शिवरायांचे नाव घेऊन राज्य करण्याचा अधिकार नाही.
(Viral : मनसैनिकाने फोन केला अन् राम कदमांना राग आला!)
- भाजप आमदाराच्या विकृतीने शिवरायांचाच अपमान झाला.
- या गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे अशी संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. महाराष्ट्राच्या तरुण पिढीस कोणता विकृत संदेश भाजप देत आहे? हेच त्यांचे हिंदुत्व आणि हीच त्यांची संस्कृती आहे काय?
- एरव्ही विरोधकांनी जनतेच्या व देशाच्या प्रश्नांवर आवाज उठवला तरी त्यांना देशद्रोही ठरविण्यासाठी जिभेचे पट्टे चालविणारे स्त्रीयांना पळवून नेणाऱ्या आपल्या आमदाराच्या बेताल बडबडीवर तोंड शिवून बसले आहेत.
- मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री पंकजा मुंडे यांनी तरी यावर बोलावे. स्त्रीयांच्या हक्कांसाठी टी.व्ही.च्या पडद्यावर ताडताड बोलणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तरी कोठे आहेत?
- राम कदमांनी जे केले ते काँग्रेसच्या आमदाराने केले असते तर एव्हाना या मंडळींनी काय गोंधळ घातला असता. राहुल गांधींना फासावर लटकवायलाच ते निघाले असते.
- या ‘हराम’ कदम यांनी आता ट्विटरवरून माफीनामा जाहीर केला आहे. अर्थात तोदेखील तीन दिवसांनी. माफी मागायला या महाशयांनी इतका वेळ घेतला यावरूनदेखील ही विकृती किती भयंकर आहे याची कल्पना येते.
- लिंगपिसाटांचे राजकारण संपवायला हवे. महिलांनी एकीचा इतिहास घडवावा. त्यांनी एकत्र यावे व सगळय़ात मोठा दणका द्यावा.