“अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन आणखी एक सेना झाली”; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 08:31 IST2025-03-08T08:30:47+5:302025-03-08T08:31:06+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. परंतु, अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन अनाजीसेना तयार झाली. ती शिवसेना नाही. त्यांचे नाव अनाजीसेना असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेनेवर केली.

uddhav thackeray slams shiv sena shinde group and called it as anajisena | “अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन आणखी एक सेना झाली”; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

“अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन आणखी एक सेना झाली”; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यांची ५९ वर्षांची पंरपरा घेऊन तीन पिढ्या त्याच मार्गाने पुढे जात आहोत. परंतु, अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन अनाजीसेना तयार झाली. ती शिवसेना नाही. त्यांचे नाव अनाजीसेना असल्याची टीका उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेनेवर केली.

मुंबईतील फोर्ट येथे स्थानीय लोकाधिकार समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवराय संचलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्वराज्य, भगव्यासोबत द्रोह अनाजी पंतच करू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणे नाही. परंतु, दुर्दैवाने अनाजी पंत, औरंगजेब याही काळात ते आले आहेत, अशी टीका ठाकरे यांनी केली.

Web Title: uddhav thackeray slams shiv sena shinde group and called it as anajisena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.