अमित शाह, तुम्ही दुधात मिठाचा खडा टाकला आहे, आता...; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 06:48 PM2023-02-19T18:48:43+5:302023-02-19T18:50:51+5:30

शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलताना आता ‘दूध का दूध पानी का पानी’ झालं असं वक्तव्य केलं. दरम्यान, रविवारी उद्धव ठाकरेंनी मुंबईत उत्तर भारतीयांशी संवाद साधला.

uddhav thackeray taget home minister amit shah pune program eknath shinde fadnavis bow and arrow shiv sena name | अमित शाह, तुम्ही दुधात मिठाचा खडा टाकला आहे, आता...; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड

अमित शाह, तुम्ही दुधात मिठाचा खडा टाकला आहे, आता...; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड

googlenewsNext

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. दरम्यान, हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, शनिवारी या निर्णयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलताना आता ‘दूध का दूध पानी का पानी’ झालं असं वक्तव्य केलं. याला प्रत्युत्तर देताना त्यांनी दुधात मिठाचा खडा टाकला आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. मुंबईतील अंधेरी येथे उत्तर भारतीयांशी संवाद साधताना त्यांनी टीकेचा बाण सोडला.

शनिवारी उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर जमलेल्या आपल्या समर्थकांना संबोधित केलं. कारच्या वर उभं राहून त्यांनी समर्थकांशी संवाद साधला होता. त्यानंतर रविवारी त्यांनी उत्तर भारतीयांशी संवाद साधला. “अमित शाह म्हणाले दूध का दूध पानी का पानी झाले म्हणाले. अजून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला नाही. पण त्यांनी दुधात मीठ घातले. आता त्याच दुधात साखर टाकण्यासाठी तुमची साथ हवी आहे. काही असेल तर लगेच आपण चर्चा करुयात,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी दंड थोपाटले. धनुष्य घेतला पण प्रभू श्रीराम माझ्या सोबत आहेत. कालच आव्हान दिले रस्त्यावर उतरून की तुम्ही चोरलेला धनुष्य घेऊन या मी मशाल घेऊन येतो निवडणुकीत. मी भाजपला सोडलंय हिंदुत्व नाही. माझ्या वडिलांनी जे शिकवलं ते यांचं हिंदुत्व नाही. राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व असल्याचंही ते म्हणाले.

हेच त्यांनाही हवं होत..
काल पुण्यात कुणीतरी आलं होतं म्हणाले शिवसेनेचे धनुष्य आम्ही गद्दारांना दिले मोगँबो खुश हुआ. हेच त्यांना पण हवं होत. मला लोकांच्या सोबत यायचे आहे. मी कधीच भेदभाव केला नाही मुख्यमंत्री असतांना पण. इथे उपस्थित जे आहेत तेच १९९२-९३ साली मुंबई वाचवण्यात होते. तेच आज गुन्हेगार ठरवता. भाजपने मला काँग्रेसकडे जाण्यास भाग पाडले. मी तर आजही हिंदूच. २०१४ साली त्यांनी युती तोडली. एकटा लढलो ६३ आमदार निवडून आणले. नंतर अमित शाह घरी आले. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन हे माझे आजही वचन आहे. अमित शहा ठीक आहे म्हणाले मग काय झाले ते सर्वश्रुत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

तेव्हा कुठे गेलेलं हिंदुत्व?
“बोहरा समाजाने बोलावलं मी गेलो, पण मी दिखावा नाही केला. पोळ्या नाही लाटल्या. मला प्रेमाने बोलावले. मुफ्ती मोहम्मद यांच्यासोबत गेले तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्व. ज्यांना जायचे ते जाऊ शकतात पण त्यांनी इतर पक्षात जायला हवे होते. शिवसैनिकांनी घाम गाळून त्यांना मोठ केलं, तेच आज मालक बनायला बघताहेत. माझे वडील हवेत पण मुलगा नको. मी काय वाईट केल तुमच्यासोबत. मी भाजपकडे मुख्यमंत्रिपद मागितले. मला मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते पण शरद पवार म्हणाले. भाजपने अडीच वर्ष त्यांनी वचन पूर्ण केले असते तर आज हे सगळं करायची गरज नव्हती,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.

Web Title: uddhav thackeray taget home minister amit shah pune program eknath shinde fadnavis bow and arrow shiv sena name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.