मुंबई : मुंबई-२०२४ ला होणाऱ्या संभाव्य लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मतदारसंघाचा संघटनात्मक आढावा बैठक पक्षाचे नेते, उपनेते, विभागप्रमुख, संघटक, समन्वयक, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख यांच्या उपस्थितीत घेतली. शुक्रवारी पार पडलेल्या मतदारसंघामध्ये उत्तर-पश्चिम, दक्षिण मुंबई या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी सुमारे एक ते सव्वा तास संवाद साधला. यावेळी त्यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा निहाय मतदारसंघांचासुद्धा ठाकरे यांनी आढावा घेतला.
आजच्या बैठकीत जुलै २०२४ होणाऱ्या मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणीला सुरुवात करण्याचे त्यांनी सूचित केले व लोकसभा निवडणुकांपर्यंत पक्षाचे ‘होऊ दे चर्चा’ या कार्यक्रमातून पक्षाचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सदर बैठकीला शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, सचिव अनिल देसाई, सचिव मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख - आमदार ॲड. अनिल परब, आमदार-विभागप्रमुख सुनील प्रभू, उपनेते अमोल कीर्तिकर, आणि सदर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.