Join us

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांचे ट्विट, उद्धव ठाकरेंची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 11:37 PM

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी विस्तार होईल,

मुंबई - मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेक वावड्या उठत असतानाच, स्वत: मुख्यमंत्र्यांनीच ट्विट करुन याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस पक्षाध्यक्ष अमित शहा तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतच विस्ताराबाबत जाहीर केले जाईल, तर अधिवेशनापूर्वी म्हणजेच रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. 

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी विस्तार होईल, असे मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केले होते. यावरून पतंगबाजी सुरू आहे. राधाकृष्ण विखे यांना मंत्रीपद देण्यास भाजपमधील निष्ठावंतांचा विरोध असल्याची चर्चा आहे. मात्र, विखे व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे मंत्रीपद निश्चित असल्याचे समजते. अनिल बोंडे व संजय कुटे यांच्यापैकी एक, तर शिवाजीराव नाईक व अतुल सावे यांच्यापैकी एक अशा दोघांना संधी मिळू शकते. रामदास आठवले यांच्या रिपाइंला एक मंत्रीपद मिळू शकेल.

शिवसेनेतही राजकीय रस्सीखेच सुरू एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद हवे आहे. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त करून, शिंदे यांनी काही आमदारांसह मातोश्रीवर शक्तिप्रदर्शन केले. शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास रामदास कदम, सुभाष देसाई व दिवाकर रावते यांचा विरोध असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेना उपमुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरण्याची शक्यता कमी आहे.शिवसेनेला दोन मंत्रीपदे शिवसेनेच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिकामे असून राष्ट्रवादीतून सेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना ते मिळू शकते. दोन मंत्रीपदे मिळावीत असा सेनेचा आग्रह आहे. त्याच, पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली आहे. 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेमंत्री