मुंबई- टी 2 टर्मिनल समोरील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या गुरुवार दि,12 रोजी सकाळी 9.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दर्शनी भागात पुर्नस्थापन करण्यात येत आहे. या अश्वारुढ पुतळ्याचं तीथी नुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.
विलेपार्ले(पूर्व) येथील मुख्य हायवे याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा (विलेपार्ले )याठिकाणी सर्व प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर याच ठिकाणी महाराजांच्या मागे निर्माण करण्यात येणाऱ्या किल्ले शिवनेरीची प्रतिकृती बांधकामाचं भूमीपुजन उद्धव ठाकरे करतील.
सकाळी 9.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर T2 पुर्नस्थापना करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. त्यानंतर याच ठिकाणी उद्धव ठाकरे उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन भाषण करतील
मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मुख्य महामहामार्गाच्या प्रवेशस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. आता याच पुतळ्याच्या मागे किल्ले शिवनेरीची प्रतिकृती निर्माण करण्यात येणार आहे. या बांधकामाचं भूमीपुजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे,परिवहन आणि संसदिय कामकाज मंत्री अँड.अनिल परब त्याच बरोबर शिवसेना नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
1999 साली माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी येथील टी -2 टर्मिनल समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन केले होते.सदर पुतळ्याच्या चारही बाजूने कुंपण टाकले आहे.१६ जानेवारी २००४ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवला होता. मात्र 2012 साली येथील विमानतळाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाल्याने येथील पुतळा हा सहार गावा जवळील वेअर हाऊस येथे बसवण्यात आला होता.मात्र 2012 साली येथील विमानतळाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाल्याने येथील पुतळा हा सहार गावा जवळील वेअर हाऊस येथे बसवण्यात आला होता.
अंधेरी (पूर्व)सहार गावा जवळील एलिव्हेटेड रोडच्या खाली असलेल्या वेअरहाऊस आयात गुदमाजवळ 2012 पासून असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ( टी-2 टर्मिनल) समोर गेल्या दि,6 मार्च रोजी स्थलांतरित करण्यात आला.आता विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात पश्चिम दुर्तगती महामार्गावर आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ( टी-2 टर्मिनल) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे असलेले भव्य पुतळे विदेशी पर्यटक आणि या परिसरातून जात-येत असलेल्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा आणि गॉडफ्रे पिमेटा व लोकमतने देखिल 2014 पासून सदर विषयी सातत्याने वाचा फोडली होती अशी माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा आणि गॉडफ्रे पिमेटा यांनी दिली.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय विमानतळामधील महाराज हा शब्द नव्हता.
वॉचडॉग फाउंडेशन व लोकमतने याप्रकरणी सातत्याने हा प्रश्न 2014 पासून मांडल्यावर अखेर 3 नोव्हेंबर 2018 रोजी महाराज हा शब्द लागला अशी माहिती निकोलस अल्मेडा आणि गॉडफ्रे पिमेटा यांनी दिली. तर महाराजांचा पुतळ्याची पुन्हा त्याच ठिकाणी पुर्नस्थापन करावी यासाठी गेली १२ वर्षे शिवसेनेनं केंद्र सरकार आणि जीव्हिके कंपनीशी सतत संघर्ष केला.आता अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दर्शनी भागात पुर्नस्थापन करण्यात येत आहे. या अश्वारुढ पुतळ्याचं तीथी नुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.