Join us

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले केदारनाथचे दर्शन; भाविकांनी समर्थनासाठी दिल्या 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 1:28 PM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह केदारनाथचे दर्शन घेतले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह काल शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी केदारनाथाचे दर्शन घेतले.  सकाळी १० वाजता ते बद्रीनाथ धामला पोहोचले. यावेळी मंदिर समितीने त्यांचे स्वागत केले. दरम्यान, मंदिर परिसरात असलेल्या मराठी भाविकांना जय महाराष्ट्राचा समर्थनात घोषणा दिल्या. 

यावेळी नेपाळचे भारतातील राजदूत शंकर प्रसाद शर्मा आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांनी कुटुंबियांसह केदारनाथला भेट दिली. तिरुपती तिरुमला देवस्थानम बोर्डाचे सदस्य सौरभ बोरा आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कैलाश घुले यांनीही केदारनाथला भेट दिली.

"कामाख्या देवी मुंबईत अन् महाराष्ट्राचा 'जाणता राजा' गुवाहटीत"

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केदारनाथचे दर्शन घेऊन बाहेर येताच बाहेर महाराष्ट्रातून गेलेले भाविक उपस्थित होते, ठाकरेंना पाहताच या भविकांनी घोषणाबाजी सुरू केली.'जय महाराष्ट्राचा' नारा देत अनेकांनी ठाकरेंना समार्थन दिले.  

आमदार नितेश राणेंनी काल टीका केली 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या नोकर, कुक यांना घेऊन काल दुपारीच डेहराडून गेल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. जरांगे पाटलांचे उपोषण सुटेस्तोवर थांबला का नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. सोबतच आदित्य ठाकरे बेपत्ता होऊ शकत नाहीत असेही राणे यांनी म्हटले आहे. 

ठाकरे कुटुंबीय काल दुपारी दोन वाजता एका खासगी विमानाने गेट नंबर ८ वरून डेहराडूनला निघून गेल्याचे मला कोणीतरी सांगितले. त्यांच्यासोबत त्यांचा कूक आणि स्टाफही आहे. हीच त्यांची मराठा आरक्षणाची काळजी आहे का? जरांगे पाटलांचे उपोषण सुटेपर्यंत का थांबला नाहीत, मग जे पक्षाचे काम करणाऱ्या, तुमच्यासारख्या पिकनिकवर न जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना दोष का द्यायचा, असा सवाल नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केला आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेकेदारनाथ