७ ऑक्टोबरला ठरणार धनुष्यबाण चिन्हाच भवितव्य; दोन्ही गटांना कागदपत्रं सादर करावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 05:28 PM2022-10-04T17:28:59+5:302022-10-04T17:35:00+5:30
शिवसेना कोणाची यावरुन उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय निवडणूक घेणार असल्याचे निर्देश दिले आहेत. आता या संदर्भात मोठी बातमी आली आहे.
मुंबई: शिवसेना कोणाची यावरुन उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय निवडणूक घेणार असल्याचे निर्देश दिले आहेत. आता या संदर्भात मोठी बातमी आली आहे. धनुष्यबाण चिन्हाबाबत ७ ऑक्टोबरला निवडणूक आयोग निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना ७ ऑक्टोबरपर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता ७ तारीख दोन्ही गटासाठी महत्वाची असणार आहे.
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या अगोदर आयोग या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. शिवेसेनेचे ज्येष्ठनेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर शिंदे भाजपसोबत जात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. दरम्यान, शिंदे गटाने शिवसेना पक्षावर दावा सांगितला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनवाणी सुरू आहे.
पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत मिळणार घरबांधणीसाठी कर्ज; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे ६ निर्णय
आता शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण कोणाचे यावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. त्यामुळे ७ ऑक्टोबर हा दिवस महत्वाचा असणार आहे.
फुटीनंतर शिवसेनेची मुंबईत पहिली परीक्षा
पक्षात पडलेल्या उभ्या फुटीनंतर शिंदेगट आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्ष आणि पक्षचिन्हावरून निवडणूक आयोगापासून न्यायालयापर्यंत लढाई सुरू आहे. दरम्यान, आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व या विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी पहिली परीक्षा मानली जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.