मुंबई : महाराष्ट्रातील या आधुनिक अफजल खानांनी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. याच गोष्टीवर राज ठाकरे यांनी बोट ठेवल्याने जुलाब सामनातून बाहेर पडत आहेत, असे प्रत्युत्तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी खासदार संजय राऊत यांना दिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन मुंबईत पार पडलं. या महाअधिवेशनात ढोल ताशांच्या गजरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून 'मनसे'वर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळय़ांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.
यावर देशपांडे यांनी संजय राऊत त्यांच्या घरीच कमी शरद पवारांच्या घरीच जास्त असायचे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपविण्याचे काम संजय राऊत करत आहेत, अशी टीका केली. तसेच देशाच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पुरावे देण्याचे आम्हीच बोललो आहोत. मग आव्हान द्यायची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
'हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही'; सामनातून 'मनसे'वर टीकास्त्रराज ठाकरेंसाठी तीन प्रश्न; ज्याची उत्तरं ठरवतील मनसेचं भवितव्य!राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका
उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जरूर जावे. पण जेव्हा प्रभू रामचंद्रच जेव्हा त्यांना विचारतील की, हिंदूत्व का सोडले तेव्हा उत्तर देण्यात तयार रहावे, असा इशाराही देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'या' दिवशी घेणार रामलल्लाचं दर्शन