Join us
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येला जाणार नाहीत उद्धव ठाकरे; नाशिकमध्ये काळाराम मंदिरात करणार पूजा, महाआरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 09:36 IST

अयोध्येतील सोहळ्याचे निमंत्रण अद्याप मिळालेले नसल्याचे ठाकरेंकडून स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नाशिक: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या दिवशी ते नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शनासह गोदावरी तीरावर महाआरती करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे म्हणाले, मला अयोध्येतील सोहळ्याचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. अयोध्याला जाण्यासाठी मला निमंत्रणाची गरज नाही. कारण श्रीराम हे सर्वांचेच आहे. राम मंदिराच्या आंदोलनात शिवसेनेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. श्रीरामावरून आता राजकारण करण्याची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :उद्धव ठाकरे