गावोगावी, दुर्गम भागापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा देणार- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 05:37 AM2020-08-16T05:37:56+5:302020-08-16T05:38:25+5:30

शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे आणि कामगारांच्या हितासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Uddhav Thackeray will provide good health facilities to villages and remote areas | गावोगावी, दुर्गम भागापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा देणार- उद्धव ठाकरे

गावोगावी, दुर्गम भागापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा देणार- उद्धव ठाकरे

Next

मुंबई : राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा पोहोचविण्यास राज्य सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सांगितले. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयातील मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या वेळी त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे आणि कामगारांच्या हितासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांचे स्वातंत्र्य दिनाचे हे पहिलेच ध्वजारोहण होते. या वेळी राज्याला संबोधित करताना ते म्हणाले की, शेतकºयाला स्वत:च्या पायावर उभे करणे हे या सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जे विकेल तेच पिकेल अशी शासनाची भूमिका आहे. कर्जाच्या समस्येतून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मुक्त करण्याचे आमचे लक्ष आहे.
>कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणेतील कर्मचारी, स्वच्छता दूत हेच आपल्यासाठी स्वातंत्र्य योद्धे.

Web Title: Uddhav Thackeray will provide good health facilities to villages and remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.