Join us

Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरे पुढाकार घेणार, पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार

By बाळकृष्ण परब | Published: January 11, 2021 9:35 PM

Maratha Reservation Update : मराठा आरक्षणामुळे मराठा समाजातून सरकारविरोधात संतापाचे वातावरण निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षण प्रश्नी पुढाकार घेण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्र लिहिणारमराठा आरक्षणासाठी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारनेही लक्ष घालण्याची मागणी करणार राज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली माहिती

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडी सरकारची चांगलीच कोंडी झालेली आहे. न्यायप्रविष्ठ असलेल्या मराठा आरक्षणामुळे मराठा समाजातून सरकारविरोधात संतापाचे वातावरण निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षण प्रश्नी पुढाकार घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्र लिहिणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत संवेदनशील आहेत. आता मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारनेही लक्ष घालावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार आहे, याबाबतची माहिती राज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैळकीमध्ये बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अनिल परब यांच्यासह राज्य शासनाने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ, शासकीय तसेच खासगी याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित होते.मराठा आरक्षणाबाबत येत्या २५ जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते. त्यानुसार राज्य सरकार आपल्या रणनितीवर अंतिम हात फिरवत असून, आजवर झालेल्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :मराठा आरक्षणउद्धव ठाकरेनरेंद्र मोदीराजकारण