उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रपरिषदेची होणार चौकशी; निवडणूक आयोगाने घेतली तक्रारीची दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 01:35 PM2024-06-01T13:35:23+5:302024-06-01T13:36:17+5:30

मुंबईत २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता ठाकरे यांनी पत्रपरिषद घेतली.

Uddhav Thackeray's press conference will be investigated The Election Commission took note of the complaint | उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रपरिषदेची होणार चौकशी; निवडणूक आयोगाने घेतली तक्रारीची दखल

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रपरिषदेची होणार चौकशी; निवडणूक आयोगाने घेतली तक्रारीची दखल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी पत्रपरिषद घेऊन केलेल्या आरोपांची चौकशी आता निवडणूक आयोग करणार आहे.

मुंबईत २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता ठाकरे यांनी पत्रपरिषद घेतली आणि केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून मुंबईत मंदगतीने मतदान सुरू आहे, असा आरोप केला होता. विरोधकांचे प्राबल्य असलेल्या भागात जाणीवपूर्वक तसे केले जात असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर भाजपने आयोगाकडे तक्रार दिली होती.

ठाकरे यांचे आरोप निराधार आहेत. मतदान सुरू असताना पत्र परिषद घेऊन असे आरोप करणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचे या तक्रारीत म्हटले होते. ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि केंद्रातील सत्तारुढ भाजप हा निवडणूक आयोगावर दबाव आणत असल्याचे भासविले, ते वस्तुस्थितीला धरून नव्हते, असेही तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी आयोग त्या पत्रपरिषदेत ठाकरे नेमके काय म्हणाले ते आयोग तपासून बघत आहे, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्याआधारे अहवाल पाठविण्यात येणार आहे.

Web Title: Uddhav Thackeray's press conference will be investigated The Election Commission took note of the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.