Uddhav Thackeray यांचे टार्गेट मुंबई-ठाणे, महापालिका निवडणुकीचे फुंकले रणशिंग, प्रकल्पांच्या केल्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 09:24 AM2021-10-16T09:24:26+5:302021-10-16T09:44:40+5:30

Uddhav Thackeray News: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही नेत्याचे भाषण झाले नाही. त्याऐवजी मुंबईसाठी शिवसेनेने काय करून दाखवले, याची चित्रफीत दाखवण्यात आली.

Uddhav Thackeray's target Mumbai-Thane, municipal election trumpets blown, projects announced | Uddhav Thackeray यांचे टार्गेट मुंबई-ठाणे, महापालिका निवडणुकीचे फुंकले रणशिंग, प्रकल्पांच्या केल्या घोषणा

Uddhav Thackeray यांचे टार्गेट मुंबई-ठाणे, महापालिका निवडणुकीचे फुंकले रणशिंग, प्रकल्पांच्या केल्या घोषणा

googlenewsNext

 मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही नेत्याचे भाषण झाले नाही. त्याऐवजी मुंबईसाठी शिवसेनेने काय करून दाखवले, याची चित्रफीत दाखवण्यात आली. स्वत: ठाकरे यांनीही मुंबईत सरकार काय-काय उभारणार, याची माहिती देत पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीचे एकप्रकारे रणशिंग फुंकले.
महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी तयार केलेली चित्रफीत दाखवून यावेळी मुंबईसाठी शिवसेनेने केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडण्यात आला. उद्धव ठाकरे म्हणाले की, दक्षिण मुंबईत दिमाखदार असे मराठी भाषा भवन आमचे सरकार बांधणार आहे. मराठी नाटकांचा इतिहास सांगणारे रंगभूमी दालनही उभारले जाईल. धारावीतील झोपडीवासीयांचे पुनर्वसन तर नक्कीच करू, पण तिथे जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्रही उभारले जाईल. वरळीत जागतिक दर्जाचे मत्स्यालय बांधले जाईल. लष्कराचे एक संग्रहालयही मुंबईत उभारले जाणार आहे.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रशंसा
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रातील नऊ दिवस ठाण्यात विक्रमी रक्तदान शिबिर घेतले, याबद्दल ठाकरे यांनी कौतुक केले. इतर कोणताही पक्ष असे शिबिर घेऊ शकत नाही, त्यांना तर बॅनर लावायलाही माणसे मिळणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

Web Title: Uddhav Thackeray's target Mumbai-Thane, municipal election trumpets blown, projects announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.