उबाठा पक्षाला 'दे धक्का'; उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौऱ्यातच महिला प्रवक्त्याचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:03 AM2024-02-23T11:03:02+5:302024-02-23T11:05:24+5:30

शिवसेना उबाठा पक्षाला जय महाराष्ट्र करत महिला आमदार मनिषा कायंदे यांनीही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Uddhav Thackeray's visit to Vidarbha and resignation from women office bearers shilpa bodkhe | उबाठा पक्षाला 'दे धक्का'; उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौऱ्यातच महिला प्रवक्त्याचा राजीनामा

उबाठा पक्षाला 'दे धक्का'; उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौऱ्यातच महिला प्रवक्त्याचा राजीनामा

बुलढाणा - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरू असतानाच शिवसेना (उबाठा) पक्षातील महिला नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विदर्भातीलमहिला नेत्या आणि उबाठा पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी मुंबईतील महिला नेत्यांवर ठपका ठेवत शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र केलं आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. त्यानंतर, शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांचीही विभागणी झाल्याचं दिसून आलं. अनेक नेते शिंदेंसोबत गेले, त्यात महिला नेत्यांचाही समावेश आहे. 

शिवसेना उबाठा पक्षाला जय महाराष्ट्र करत महिला आमदार मनिषा कायंदे यांनीही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतील ही राजी-नाराजी अद्यापही सुरुच असल्याचे दिसते. उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावेळीच विदर्भातील महिला नेत्याने सोशल मीडियातून आपला राजीनामा दिला आहे. 


माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे, असे बोडखे यांनी म्हटले. मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्या बद्दल दोघींचे देखील अभिनंदन. पुढे देखील शिवसेना भवनात बसून असेच कार्य करत राहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताच्या मटनाचा वास गेला असेलच. पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा, असा टोलाही बोडखे यांनी लगावला आहे. शिल्पा बोडखे या सोशल मीडियातून शिवसेना पक्षाची भूमिका मांडत होत्या. भाजपावर थेट टीका करत त्यांनी शिवसेना पक्षाची बाजू सातत्याने मांडल्याचं त्यांच्या अकाऊंटवरुन दिसून येते.

दरम्यान, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून ते बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमासाठी गेले आहेत. मात्र, मनोहर जोशींच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांनी आजचे सर्वच कार्यक्रम रद्द केले असून ते मुंबईकडे निघाले आहेत. ''आज आम्ही जरी दौऱ्यावर असलो तरी दौरा थांबवून मुंबईकडे निघतोय, राज्यभरातून, देशभरातून डॉ. मनोहर जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.'', असे माहिती संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, जळगावच्या जामोद येथे गुरुवारी उद्धव ठाकरेंची जाहीर सभाही झाली.

Web Title: Uddhav Thackeray's visit to Vidarbha and resignation from women office bearers shilpa bodkhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.