Join us  

रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 7:39 AM

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून रश्मी ठाकरेंचं नाव महिला मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत, वाढदिवसानिमित्त कलानगर परिसरात बॅनरबाजी

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागलेत. त्यात प्रामुख्याने ठाकरे गटाकडून सातत्याने मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही मागणी करताना दिसून येत आहे. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे केली होती मात्र त्याला काँग्रेस-राष्ट्रवादीनं स्पष्ट नकार देण्यात आला. आता रश्मी ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्रिपदाबाबत वांद्रे येथील कलानगरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

या बॅनरवर पुढचा मुख्यमंत्री आपल्या परिवाराचाच, त्याचे प्रतिबिंब तुमच्यात ही दिसते असा उल्लेख करत रश्मी ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मातोश्री निवासस्थानाबाहेर हे बॅनर्स लागले आहे. २३ सप्टेंबर म्हणजे आज रश्मी ठाकरेंचा वाढदिवस असून युवासेनेकडून हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. याबाबत कार्यकर्त्यांनी म्हटलं की, मागचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेमहाविकास आघाडीकडून होते, आता येणारा मुख्यमंत्रीही आमच्या परिवाराचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

त्याशिवाय दिल्लीसारख्या राज्यात आतापर्यंत ३ मुख्यमंत्री झाल्यात त्यामुळे महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाव्यात ही जनतेची इच्छा आहे. त्याचे प्रतिबिंब आम्हाला रश्मी ठाकरेंमध्ये दिसते असं त्यांनी सांगितले.  ठाकरे कुटुंबाचं शिवाय महिला मुख्यमंत्री किंवा उद्धव ठाकरे हे असायला हवा. ठाकरे कुटुंबातील शिवसेना परिवारातीलच मुख्यमंत्री होतील या उद्देशाने आम्ही हे बॅनर्स लावले आहेत असंही कार्यकर्त्यांनी म्हटलं.

राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको

अलीकडेच राज्याला महिला मुख्यमंत्री मिळणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या की, रश्मी ठाकरे यांनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेला नाही. त्या त्यांच्या पतीच्या सोबत असतात. याचा अर्थ त्या राजकारणात आहेत असं होत नाही. त्यामुळे राज्यात महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये असं त्यांनी म्हटलं होतं. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात महिला मुख्यमंत्री हा कायम चर्चेचा विषय राहिला. आजपर्यंत राज्यात एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीवेळी, सत्तास्थापनेवेळी मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक नावे चर्चेत येत असतात.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाविकास आघाडीकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४