Join us

मेट्रो-३च्या स्थानकांसाठी सरकत्या जिन्याची उभारणी 'युआंडा-रॉयल कॉन्सोर्टियम' समूह करणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 6:22 PM

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत आरे डेपो ते दादर दरम्यान एकूण १३ स्थानकांमध्ये सरकते जिन्यांची यंत्रणा उभारण्यासाठी"युआंडा- रॉयल कॉन्सोर्टियम" या समूहाची निवड करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत आरे डेपो ते दादर दरम्यान एकूण १३ स्थानकांमध्ये सरकते जिन्यांची यंत्रणा उभारण्यासाठी"युआंडा- रॉयल कॉन्सोर्टियम" या समूहाची निवड करण्यात आली आहे. ही निवड आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रियेद्वारे जायकाच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात आली आहे

"युआंडा- रॉयल कॉन्सोर्टियम" हे कंत्राटदार मेट्रो-३ च्या १३ स्थानकांच्या १७६ सरकत्या जिन्यांचे आरेखन, उत्पादन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंग अशा प्रकारची कामे करणार आहेत. सर्वात जास्त प्रमाणात प्रवासी वाहून नेण्याची क्षमता, ऊर्जाबचत करणारे रिजनॅरेटिव्ह ड्राइव्ह, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन अशा कामांसाठी सरकत्या जिन्यांचे आरेखन करण्यात येणार आहे. 

याप्रसंगी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या, " अवजड सरकते जिने ही मेट्रो-३ साठी अत्यंत महत्वाची यंत्रणा असून याद्वारे प्रवाशांना सर्वोत्तम आरामदायी सुविधा उपलब्ध होणार आहेत. मेट्रो-३ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक सरकत्या जिन्यांची उभारणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत".

टॅग्स :मेट्रोमुंबई