Join us

युजीसी-नेटचा निकाल जाहीर

By रेश्मा शिवडेकर | Published: January 19, 2024 12:25 PM

तांत्रिक अडणींमुळे हा निकाल लांबला होता.

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पदवी महाविद्यालये अथवा विद्यापीठांमधील व्याख्याता पदासाठी आवश्यक असलेल्या युजीसी-नेट या पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तांत्रिक अडणींमुळे हा निकाल लांबला होता.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ६ डिसेंबर ते १९ डिसेंबर, २००२३ या कालावधीत घेतलेल्या या परीक्षेत ९,४५,९१५ विद्यार्थी बसले होते. देशभरातील २९२ शहरांमध्ये ८३ विषयांमध्ये युजीसी-नेट झाली. हा निकाल १७ जानेवारीला जाहीर होणार होता. मात्र, तांत्रिक अडणींमुळे दिलेल्या तारखेला तो जाहीर होऊ शकला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने एनटीए ही परीक्षा घेते. यात पात्र ठरलेले उमेदवार असिस्टंट प्रोफेसर, ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) यांकरिता पात्र ठरले आहेत.

पुरातत्त्व शास्त्र विषयाच्या उत्तरतालिकेत (आन्सर की) अनेक त्रुटी असल्याने हा निकाल लांबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आपले लॉगइन करून पुढील संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. 

संकेतस्थळ - ugcnet.nta.ac.in किंवा nta.ac.in

टॅग्स :परीक्षापरिणाम दिवस