विद्यार्थ्यांच्या करिअरचीही माहिती ठेवणार यूजीसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 05:58 AM2019-11-15T05:58:05+5:302019-11-15T05:58:26+5:30

देशातील विविध विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरवर लक्ष ठेवता यावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ‘विद्यार्थी करिअर आणि माजी विद्यार्थी’ योजना हाती घेतली आहे.

UGC will also keep track of students' careers | विद्यार्थ्यांच्या करिअरचीही माहिती ठेवणार यूजीसी

विद्यार्थ्यांच्या करिअरचीही माहिती ठेवणार यूजीसी

Next

मुंबई : देशातील विविध विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरवर लक्ष ठेवता यावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ‘विद्यार्थी करिअर आणि माजी विद्यार्थी’ योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत देशातील विद्यापीठ व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची माहिती एकत्र करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीकडून विद्यार्थी करिअर आणि माजी विद्यार्थी योजनेसंदर्भात यूजीसीने शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ व सर्वसामान्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत सूचना मागवल्या आहेत. देशातील केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ, डीम्ड युनिव्हर्सिटी, खासगी विद्यापीठ असे तब्बल ९०७ विद्यापीठ यूजीसीशी संलग्न आहेत. देशातील या विद्यापीठांशी ४० हजार महाविद्यालये संलग्न असून, यामध्ये दरवर्षी तीन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यातील एक कोटी विद्यार्थी दरवर्षी पदवी घेतात.
उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे महाविद्यालयांत प्रवेश घेत असल्याने विद्यापीठातील शैक्षणिक विभागांशी त्यांचा संबंध येत नाही. त्यामुळे महाविद्यालये व विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या करिअरची माहिती जमा करण्याचा निर्णय यूजीसीने घेतला आहे.
>२२ नोव्हेंबरपर्यंत सूचना पाठवण्याचे आवाहन
यूजीसीकडून शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ व सर्वसामान्यांकडून सूचना मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सूचना २२ नोव्हेंबरपर्यंत studentprogression.alumni@gmail.com या मेल आयडीवर पाठवण्याचे आवाहन यूजीसीकडून करण्यात आले आहे.

Web Title: UGC will also keep track of students' careers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.