जुहूत रॅश ड्रायव्हिंगचा बळी, मोटारसायकलची धडक, एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 02:52 AM2017-09-17T02:52:18+5:302017-09-17T02:52:26+5:30
जुहूत रॅश ड्रायव्हिंगमुळे एका सोळा वर्षीय युवकाला नाहक जीव गमवावा लागला. शोभीत विशाल दोशी असे त्याचे नाव असून, या प्रकरणी सुभाष देवेंद्र या (२२, रा. नेहरूनगर झोपडपट्टी, विलेपार्ले) या तरुणाला जुहू पोलिसांनी अटक केली.
मुंबई : जुहूत रॅश ड्रायव्हिंगमुळे एका सोळा वर्षीय युवकाला नाहक जीव गमवावा लागला. शोभीत विशाल दोशी असे त्याचे नाव असून, या प्रकरणी सुभाष देवेंद्र या (२२, रा. नेहरूनगर झोपडपट्टी, विलेपार्ले) या तरुणाला जुहू पोलिसांनी अटक केली. शोभीतच्या मृत्यूचा त्याच्या मित्रांना जबर धक्का बसला असून, त्यांनी अशा ‘रायडर्स’वर कडक कारवाईची मागणी केली आहे.
शोभीत हा जुहूतील ऋतंबरा कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होता. गुरुवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास तो कॉलेजमधून बाहेर पडून मित्रांसह घरी निघाला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या स्पोटर््स बाइकने त्याला जोरदार धडक दिली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तासभर सुरू होती ‘रायडिंग’
शोभीत कॉलेजबाहेर पडण्याच्या तासभर आधीपासून देवेंद्र व त्याचे तीन मित्र मोटारसायकलवरून फेºया मारत होते. शोभीतला धडक दिल्यानंतर काही अंतर गाडीने त्याला फरफटत नेले. त्यानंतर ते सगळे पळून गेले.
दहा मिनिटांपुढे होता मृत्यू!
‘शोभीतला रुग्णालयात दाखल केले तेव्हादेखील सुभाष आणि त्याचे चार मित्र आमच्यासोबत अरेरावी करत होते. अभी कुछ हुवा तो नही ना, जब होगा तब देखेंगे’ अशी उत्तरे ते आम्हाला देत होते, असे शोभीतच्या मित्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.