उल्हासनरची समीक्षा अग्रवाल देशात तिसरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 05:01 AM2018-07-21T05:01:39+5:302018-07-21T05:02:05+5:30
‘दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंट्स आॅफ इंडिया’ (आयसीएआय) मार्फत मेमध्ये घेतलेल्या सीए फायनल आणि फाऊंडेशन परीक्षेचा आॅनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला.
मुंबई : ‘दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंट्स आॅफ इंडिया’ (आयसीएआय) मार्फत मेमध्ये घेतलेल्या सीए फायनल आणि फाऊंडेशन परीक्षेचा आॅनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत सुरतचा प्रीत शाह देशात पहिला आला आहे. तर बंगळुरूचा अभिषेक नागराज दुसरा, उल्हासनगरची समीक्षा अग्रवाल देशात तिसरी आली.
यंदा सीएची परीक्षा जुना अभ्यासक्रम आणि नवा अभ्यासक्रम अशा दोन विभागात घेण्यात आली. जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल ९.०९ टक्के इतका लागला आहे. तर, नव्या अभ्यासक्रमाचा निकाल ९.८३ टक्के लागला आहे. देशभरातून जुन्या अभ्यासक्रमातून नऊ हजार १०४ विद्यार्थी तर नव्या अभ्यासक्रमातून १३९ विद्यार्थी सीए झाले आहेत.
९३६ विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली. यापैकी ९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात सुरतचा प्रीत शाह देशात पहिला आला. बंगळुरूचा अभिषेक नागराज दुसरा तर उल्हासनगरची समीक्षा अग्रवाल तिसरी आली. जुन्या अभ्यासक्रमाची २७ हजार ७२७ विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली. यापैकी २५२० विद्यार्थी दोन्ही ग्रुप उत्तीर्ण झाले. यात जयपूरचा अतुल अग्रवाल देशात पहिला, अहमदाबादचा संदीप दलाल दुसरा, सुरतमधील अनुराग बगारिया तिसरा आला आहे. सीएबरोबरच सीपीटी आणि फाऊंडेशन परीक्षेचा निकालही जाहीर झाला. तो अनुक्रमे २८.०६ व १९.२४ टक्के लागला आहे.