Join us

अखेर निवडणुकीच्या वर्षात शालेय वस्तू आॅनटाइम

By admin | Published: December 30, 2016 3:48 AM

विकासकामांचे प्रस्ताव घाईघाईने स्थायी समितीपुढे आणण्यास प्रशासनाला जबाबदार ठरवणाऱ्या शिवसेनेने या प्रकल्पांचे श्रेय मात्र आपल्या खिशात घातले आहे. महापालिकेच्या

मुंबई : विकासकामांचे प्रस्ताव घाईघाईने स्थायी समितीपुढे आणण्यास प्रशासनाला जबाबदार ठरवणाऱ्या शिवसेनेने या प्रकल्पांचे श्रेय मात्र आपल्या खिशात घातले आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पक्षाची कामगिरी बेस्ट ठरण्यासाठी पालिका शाळांमध्ये २७ प्रकारचे शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वीच स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळेल, असा दावा शिवसेनेने केला आहे.महापालिका शाळांमधील सुमारे चार लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्य देण्यात येते. मात्र आतापर्यंत या वस्तूंना लेटमार्कच लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असे. रेनकोट पावसाळ्यानंतर तर पुस्तक परीक्षेनंतर मिळत असल्याने हे साहित्य देण्याचे उद्दिष्ट निष्फळ ठरत होते. परंतु पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करण्याचा सपाटाच सुरू आहे. स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तब्बल १०१५४ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. (प्रतिनिधी)१४३ विज्ञान प्रयोगशाळा : विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोगांचे प्रात्यक्षिक, वैज्ञानिक उपकरणांची ओळख होणे, वैज्ञानिक साहित्य हाताळण्याचे कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. यासाठी २०१६-१७मध्ये पालिकेच्या १०२ प्राथमिक व ४१ माध्यमिक शाळांमध्ये नवीन विज्ञान प्रयोगशाळा निर्माण करण्यात येत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच हे साहित्य विज्ञान प्रयोगशाळेत उपलब्ध करून दिले जाणार आहे.