Join us

घरासाठी गिरणी कामगारांचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 5:01 AM

गेल्या तीन वर्षांत सरकारने गिरणी कामगारांसाठी एकही नवे घर बांधलेले नाही. त्यामुळे १९ मार्चपर्यंत गिरणी कामगारांसाठी नवीन घरांच्या उभारणीसंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास २० मार्चपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा गिरणी कामगार कृती संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

मुंबई : गेल्या तीन वर्षांत सरकारने गिरणी कामगारांसाठी एकही नवे घर बांधलेले नाही. त्यामुळे १९ मार्चपर्यंत गिरणी कामगारांसाठी नवीन घरांच्या उभारणीसंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास २० मार्चपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा गिरणी कामगार कृती संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. यासंदर्भातील पत्र बुधवारी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांनी ‘लोकमत‘शी बोलताना सांगितले.सरकारने ज्या सोडती काढल्या, त्या सर्व आघाडी सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी आहे. गेल्या तीन वर्षांत या सरकारने गिरणी कामगारांसाठी एकही नवे घरे बांधलेले नाही. त्यामुळे गिरणी कामगारांमध्ये संतापाची लाट आहे. विकास नियंत्रण नियमावलीमध्ये सुधारणा करताना कामगारांना एकूण जमिनीपैकी एक तृतीयांश घरे मिळणार आहेत. हा निर्णय झाल्यास गिरणीच्या जागेत जास्तीत जास्त घरे मिळतील. त्यामुळे तातडीने निर्णयाचा अध्यादेश काढण्याची मागणी संघटनेने केली आहे. दरम्यान, घरासाठी सुमारे १ लाख ७५ हजार गिरणी कामगारांनी म्हाडाकडे अर्ज केले आहेत. त्यासाठी सरकारने कालबद्ध घरबांधणीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी गिरणी कामगारांचे नेते गोविंदराव मोहिते यांनी केली आहे.