Join us

आपल्याच कर्मचाऱ्यांचा एअर इंडियाला विसर; गलिच्छ आरामगृहात केला मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 6:02 AM

केबिन कर्मचाऱ्यांसाठी हॉटलचे बुकिंगच न केल्यामुळे त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

मुंबई : प्रवाशांना घेऊन हैदराबादला गेल्यानंतर विमान कंपनीने स्वतःच्या केबिन कर्मचाऱ्यांसाठी हॉटलचे बुकिंगच न केल्यामुळे त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. हॉटेलच न मिळाल्यामुळे अखेर या कर्मचाऱ्यांवर कंपनीच्या ट्रेनिंग सेंटरमधील आरामगृहात राहण्याची वेळ आली. मात्र ते आरामगृह गलिच्छ आणि फारशा सुविधा नसलेले होते. 

जेव्हा विमान कंपनीचे कर्मचारी सेवेचा भाग म्हणून अन्य शहरात किंवा परदेशात जातात, त्यावेळी त्यांच्या राहण्याची सोय कंपनीतर्फे चांगल्या दर्जाच्या हॉटेलमध्ये केली जाते. वैमानिक तसेच केबिन कर्मचाऱ्यांना आराम मिळावा, असा त्यामागील उद्देश असतो. एअर इंडियाचे विमान बुधवारी हैदराबाद येथे उतरले. त्यावेळी केबिन कर्मचाऱ्यांसाठी हॉटेलचे बुकिंगच केले गेले नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात आसरा घेतला.

चौकशीचे आदेशएअर इंडिया कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचे बुकिंग करण्यास विसरल्यामुळे त्यांना त्रास सोसावा लागला. कंपनीच्या व्यवस्थापनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :मुंबईएअर इंडिया