Join us

विनाअनुदानितचे शिक्षक आंदोलनावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 5:10 AM

अनुदान कॅबिनेटमध्ये मंजूर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती विनाअनुदानित, अनुदानित शाळा कृती समितीचे मुंबई अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली.

मुंबई : शाळांच्या अनुदानाची फाईल सध्या सचिवांकडे आहे. लवकरच ती पुढे पाठवली जाणार असून आचारसंहितेपूर्वी अनुदान जाहीर करू, असे आश्वासन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आझाद मैदानातील आंदोलक विनाअनुदानित शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दिले. मात्र आता अनुदान कॅबिनेटमध्ये मंजूर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती विनाअनुदानित, अनुदानित शाळा कृती समितीचे मुंबई अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली.सोमवारी सकाळपासूनच विनाअनुदानित कृती समितीचे शिक्षक, अधिकारी आझाद मैदानात आंदोलनाला बसले होते. दुपारी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावून घेतल्याची माहिती रेडीज यांनी दिली. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी वाढीव अनुदानाची फाईल सध्या ती अर्थ सचिवांकडे असल्याचे सांंगितले. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी अर्थ सचिवांना फोन लावून माहिती घेतली असता फाईल लवकरच पुढे पाठवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.कधी अनुदान जाहीर होणार व किती, असा प्रश्न शिष्टमंडळान केला. यावर आचारसंहितेपूर्वी अनुदान जाहीर होईल; मात्र किती, असे विचारू नका. यापूर्वीच्या लोकांनी गैरसमज पसरवले, असे उत्तर शिक्षणमंत्र्यांनी दिल्याचे रेडीज यांनी सांगितले. येत्या आठ दिवसांत उपसमितीची बैठक घेऊन फाईल अर्थ विभागाकडे पाठवली जाईल, असे सांगत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन शिक्षणमत्र्यांनी केले. मात्र, फाईल कॅबिनेटमध्ये मंजूर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय विनाअनुदानित शाळा कृती समितीने घेतल्याचे रेडीज यांनी सांगितले.

टॅग्स :शिक्षकसंप