Join us

अनधिकृत इमारतींना अधिकाऱ्यांचे अभय, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 2:16 AM

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सध्या शेकडो टोलेजंगी अनधिकृत इमारतींची बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना महानगरपालिकेचे उच्च प्रशासकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे.

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सध्या शेकडो टोलेजंगी अनधिकृत इमारतींची बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना महानगरपालिकेचे उच्च प्रशासकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. या बेकायदा बांधकामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून याबाबत पालिका आयुक्तांशी चर्चाही केली आहे.सध्या डोंबिवलीतील २७ गावे आणि कल्याण येथील पूर्व तसेच अ प्रभागक्षेत्राचा परिसर येथे सात ते आठ मजल्यांच्या बेकायदा इमारतींची कामे सुरू आहेत. एकीकडे या बांधकामांना कर लागू द्यायचा नाही आणि बेकायदा इमारती बांधून विकासकांकडून मोठी रक्कम उकळायची असे उद्योग उच्च अधिकाºयांनी सुरू ठेवले आहेत. त्यातून त्यांचा आर्थिक फायदा होत असला तरी प्रत्यक्षात या भागातील ग्रोथ सेंटरसारख्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा चक्काचुराडा झाला आहे.याखेरीज या बेसुमार अवैध बांधकामांमुळे या भागातील सोयी-सुविधांवर प्रचंड ताण येऊन त्यांचा दर्जा अगदीच सुमार झाला आहे. तसेच कोणतेही सरकारी कर भरले जात नसल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे, असाही आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे.या वस्तुस्थितीची जाणीव झाल्याने आता मुख्यमंत्रीदेखील नाराज असून त्यांनी उच्च अधिकाºयांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तसे पत्रच कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त यांना पाठवण्यात आले आहे.