'ते' बांधकाम अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 02:21 AM2018-02-22T02:21:17+5:302018-02-22T02:21:19+5:30

खासदार विकास कार्यक्रमाअंतर्गत कुर्ला नेहरूनगर येथे म्हाडा आणि महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता केलेले व्यायामशाळेचे अनधिकृत बांधकाम वादाच्या भोवºयात सापडले आहे.

'That' unauthorized construction | 'ते' बांधकाम अनधिकृत

'ते' बांधकाम अनधिकृत

googlenewsNext

मुंबई : खासदार विकास कार्यक्रमाअंतर्गत कुर्ला नेहरूनगर येथे म्हाडा आणि महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता केलेले व्यायामशाळेचे अनधिकृत बांधकाम वादाच्या भोव-यात सापडले आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने याबाबतच्या सर्व परवानग्या सादर करण्यासाठी झोपडपट्टी सुधार मंडळाला पत्र पाठविले आहे.
नेहरूनगर येथील इमारत क्रमांक ४६शेजारील भूखंडावरील या व्यायामशाळेसभोवतालचा बराचसा भाग अनधिकृत वास्तूत सामावून त्यावर स्लॅब टाकून पक्क्या स्वरूपाचे बांधकाम करण्यात आले आहे. तरी या बांधकामासंबंधित परवानग्या नसतील, तर तत्काळ कारवाई करून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात यावे, असे निवेदन चुनाभट्टी येथील रहिवाशांनी म्हाडाच्या मुख्य अधिकाºयांना सादर केले आहे.
हा भूखंड डीपीआरजीकरिता राखीव असताना, तेथे पूर्वी आमदार निधीतून स्वयंभू मित्रमंडळाच्या व्यायामशाळेचे बांधकाम करण्यात आले होते. नियमांप्रमाणे मोकळ्या भूखंडाच्या १० टक्के बांधकाम करणे क्रमप्राप्त असते, तरीही म्हाडाचे सर्व नियम डावलून कोणत्याही परवानगीशिवाय सदर वास्तू अस्तित्वात होती. त्यानंतर, आता या वास्तूचे खासदार विकास कार्यक्रमांतर्गत दुरुस्तीच्या नावाखाली नियमबाह्य पद्धतीने मूळ वास्तूच्या तिप्पट बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे खासदार पूनम महाजन यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या या व्यायामशाळेचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, अशा तक्रारी या विभागातील नागरिकांकडून वारंवार येत आहेत.
या बाबीची गांभीर्याने दखत घेऊन, या बांधकामासाठी आपल्यामार्फत देण्यात आलेल्या परवानगींचा लेखी स्वरूपात अहवाल सादर करावा, असे पत्र म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी झोपडपट्टी सुधार मंडळाला पाठविले आहे. याबाबत लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या विभागातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: 'That' unauthorized construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.