पैसे खाल्ले नसतील तर अनधिकृत बांधकाम तोडा, भाजपा नेत्याचे अधिकाऱ्यास पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 02:11 PM2019-12-07T14:11:25+5:302019-12-07T14:11:32+5:30

भाजपाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने प्रभाग अधिकारायास दिले पत्र

Unauthorized construction breaks down if money is not consumed, bjp leader letter of officer | पैसे खाल्ले नसतील तर अनधिकृत बांधकाम तोडा, भाजपा नेत्याचे अधिकाऱ्यास पत्र

पैसे खाल्ले नसतील तर अनधिकृत बांधकाम तोडा, भाजपा नेत्याचे अधिकाऱ्यास पत्र

Next

मीरारोड - तुम्ही जर पैसे खाल्ले नसतील भ्तर अनधिकृत बांधकाम तोडा असे लेखी पत्रच भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी कमलाकर घरत यांनी प्रभाग अधिकारी दिपाली पोवार यांना दिले आहे. माजी आमदार सांगतील ते बांधकाम तोडायचे, त्यांनी नाही सांगीतले तर तोडायचे नाही असा घरचा अहेर घरत यांनी दिला आहे.

कमलाकर घरत हे स्थानिक ग्रामस्थ असुन भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. ते भाजपाचे शहर जिल्हा सचीव आहेत. त्यांनी प्रभाग समिती ३ च्या प्रभाग अधिकारी दिपाली पोवार यांना तुम्ही पैसे खाल्ले नसतील तर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा असे लेखी पत्र देऊन खळबळ उडवुन दिली आहे. भार्इंदर पुर्वेच्या आरएनपी पार्क येथे सर्वे क्र. ७८० मध्ये खाडी आणि कांदळवन किनारी सीआरझेड बाधित जागेत भले मोठे अनधिकृत बांधकाम सुरु आहे. या बांधकामा लगतच नव्याने ३ - ४ खोल्यांची चाळ बांधण्यात आली आहे.

सदर जागा ही माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांशी संबंधित ७११ कंपनीच्या ताब्यातली असुन येथे सर्वेश्ववर चॅरीटेबल ट्रस्टच्या आड सदरची बेकायदा बांधकामे केली जात असल्याचे आरोप गेल्या दोन महिन्यां पासुन सातत्याने होत आहेत. मनसेचे दिनेश कनावजे सह अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. तसे असताना देखील दिपाली पोवार यांनी सदर बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास सातत्याने टाळटाळ चालवली आहे. आयुक्त बालाजी खतगावकर यांनी देखील तीन वेळा पोवार यांना कारवाई करण्यास सांगीतल्याचे समजते. तर बेकायदा बांधकामांवर कारवाई न करता पोवार यांनी नवघर पोलीस ठाण्यात सदर बांधकामा विरुध्द सर्वेश्वर चॅरीटेबल ट्रस्ट विरोधात एमआरटीपी कायद्या खाली गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी कमलाकर घरत यांनी देखील पोवार यांना पत्र देऊन तुम्ही पैसे खाल्ले नसतील तर सदरचे बेकायदा बांधकाम तोडा अशी लेखी मागणीच केली आहे. तक्रार करुन देखील सीआरझेड बाधित सर्वे क्र. ७८० मधले बेकायदा बांधकाम तोडले नाही. तसेच सदर प्रभाग समती मध्ये दिवाळीच्या सुट्टीत देखील बेकायदा बांधकामे झाली आहेत. सुजाता शॉपींग सेंटर शेजारी रहदारीचा रस्ता बंद करुन शेड बांधुन कारखाना सुरु केला. पोटगाळा बांधुन त्यात भट्टी लावुन घातक रसायनांचा वापर केला जात असल्याने रहिवाशी त्रासले आहेत. त्याची तक्रार सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी करुन देखील पोवार यांनी कारवाई केली नाही असे पत्रात म्हटले आहे.

माजी आमदाराशी संबंधित बेकायदा बांधकाम तसेच अन्य बांधकाम दिपाली पोवार यांनी तोडले नसल्या बद्दल संताप व्यक्त करत ते सांगतील ते बांधकाम तोडायचे आणि ते नाही सांगतील त्याला हात पण लावायचा नाही असा प्रकार महापालिकेचा सुरु असल्याचा आरोप घरत यांनी केला आहे. मीरा भार्इंदर शहर काय आमदाराच्या बापाचे आहे का ? असा संतप्त सवाल देखील घरत यांनी पत्रात विचारला आहे.

Web Title: Unauthorized construction breaks down if money is not consumed, bjp leader letter of officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.