इमारतीलगतच्या मोकळ्या जागेत अनधिकृत बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 02:07 AM2019-08-03T02:07:26+5:302019-08-03T02:07:39+5:30
मुंबई : अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांविरूद्ध तक्रारी करण्यासाठी महापालिकेने हेल्पलाईन क्रमांक सज्ज ठेवला असला तरी प्रत्यक्षात तक्रारी करूनही त्यानुसार ...
मुंबई : अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांविरूद्ध तक्रारी करण्यासाठी महापालिकेने हेल्पलाईन क्रमांक सज्ज ठेवला असला तरी प्रत्यक्षात तक्रारी करूनही त्यानुसार कारवाई होईलच, याची शाश्वती नाही. इमारतीलगत मोकळ््या सोडण्याच्या जागेत चक्क दुमजली बांधकाम करण्याचा प्रकार मालाड येथे घडूनही त्याकडे महापालिका डोळेझाक करीत आहे.
मालाड (पश्चिम) येथील सोमवारी बाजारातील भाईलाल रोडवरील नयना बिल्ंिडगलगत मोकळ््या सोडावयाच्या जागेतच बिल्डिंगला लागून हे दुमजली बांधकाम करण्यात आले आहे. या अतिक्रमणामुळे अनुचित घटना घडल्यास या विभागात अग्निशमन दलाची वाहने येऊ शकत नाहीत. याबाबत स्थानिक रहिवाशांनी तक्रारी करूनही महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत निवेदन सादर करून अतिक्रमणाला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या ठिकाणी बार सुरू करण्यात आला असून येथून जवळच तीन प्रार्थनास्थळे आहेत. त्यामुळे येथे होणाºया ध्वनीप्रदूषणाचा स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याचे मोहन कृष्णन यांनी सांगितले.
हे अतिक्रमित बांधकाम प्रार्थनास्थळांशेजारी असून ध्वनीप्रदूषणा-बाबत रहिवाशांकडून माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. याबाबत कारवाई करण्याची सूचना मी महापालिकेला केली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागासोबतही पत्रव्यवहार करणार आहे.
- विनोद मिश्रा, प्रभाग समिती अध्यक्ष, पी / उत्तर विभाग