Join us  

मुंबईत शैक्षणिक भूखंडावर शिवसेना नेत्याच्या नातेवाईकाचं अनाधिकृत बांधकाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 12:50 PM

Mumbai News : मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. त्यात सत्ताधारी शिवसेना नेत्यांचा नातेवाईकांचे ही अशीच अनधिकृत बांधकाम आहेत असं गोवंडी येथे उघड होत आहे.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना मुंबई मधील शैक्षणिक भूखंडावर अनधिकृत व्यावसायिकांनी केलेलं अतिक्रमणवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. त्यात सत्ताधारी शिवसेना नेत्यांचा नातेवाईकांचे ही अशीच अनधिकृत बांधकाम आहेत असं गोवंडी येथे उघड होत आहे. याबाबत स्थानिक लोकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे सत्ताधारी नेत्यांचा नातेवाईकांना वेगळा न्याय आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईत  गोवंडी स्थित २ एकर परिसरात आरक्षित शैक्षणिक भूखंडावर कोविडच्या काळात बेकायदेशीर गोल्डन बॅक्विट नावाने बेकायदेशीर लग्नाचा हॉल व ३ दुकाने संजय दिवेकल यांनी तयार केले आहेत.याबाबत तक्रार करूनही तरी सन २०१८ पासून या अतिक्रमण करणाऱ्यांवर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी महेंद्र उबाळे हे संरक्षण देत असून कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. या संपूर्ण शैक्षणिक आरक्षित भूखंडावरती ट्रॉम्बे विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम काते यांचे मेहुणे संजय दिवेकल यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत वेळोवेळी कागदपत्र  व तक्रार मुंबई महानगर पालिकेला स्थानिकांनी केली आहे. परंतु या प्रकरणांमध्ये राजकीय दबावापोटी महापालिकेकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मगरे यांनी केला आहे. 

 या अनधिकृत बांधकामा संदर्भात  तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यक्रते प्रदीप मगरे यांनी व स्थानिकांनी केलीय. जर महापालिका प्रशासनाने या प्रकरणा संदर्भात कारवाई आता केली नाही तर लोकयुक्तांकडे तक्रार करावी लागेल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. त्याचबरोबर वेळ पडल्यास मुंबई उच्च न्यायालय मध्ये हि या प्रकरणी महापालिका प्रशासना विरोधात तक्रार दाखल करू असंही स्थानिकांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :शिवसेनामुंबईउद्धव ठाकरे