मुंबईतील एसटी स्थानकात अनधिकृतपणे उभारला नाथजल स्टॉल ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:07 AM2021-03-10T04:07:28+5:302021-03-10T04:07:28+5:30
मुंबई : मुंबईतील एसटी स्थानकांमध्ये नाथजल स्टॉल उभारण्यात आले आहेत. मात्र, या नाथजल स्टॉलच्या बांधकामासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आलेली ...
मुंबई : मुंबईतील एसटी स्थानकांमध्ये नाथजल स्टॉल उभारण्यात आले आहेत. मात्र, या नाथजल स्टॉलच्या बांधकामासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही.
एसटीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने नाथजल या शुद्ध पेयजल योजनेचे लोकार्पण परिवहन मंत्री व एस. टी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत महामंडळाच्या बसस्थानकावर महामंडळाचे अधिकृत बाटली बंद पेयजल उपलब्ध करून देण्यात येत आहे.
नाथजल स्टॉल मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला स्थानकात उभारण्यात आले आहेत. याबाबत एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती विभागाचे अभियंता व्ही. एस. पाटील म्हणाले, एस.टी. स्थानकात हे स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे त्यासाठी महापालिकेच्या परवानगीची आवश्यकता नाही.
परवानगी आवश्यक
कोणतेही बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी पालिकेच्या बिल्डिंग प्रपोझल डिपार्टमेंटची परवानगी आवश्यक आहे. परवानगीविना हे स्टॉल उभारण्यात आले असतील त्यांच्यावर पालिकेच्या नियमानुसार कारवाई होईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.